---Advertisement---

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, डी कॉकसह ‘या’ खेळाडूंचे पुनरागमन

South Africa Team
---Advertisement---

येत्या २६ डिसेंबरपासून भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होणार आहे. (India Tour Of South Africa) या दौऱ्याच्या सुरुवातीला ३ सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) खेळली जाणार आहे. १५ जानेवारी २०२२ रोजी ही मालिका संपेल. अनुक्रमे सेंच्यूरियन, जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथे हे सामने खेळवले जातील. या मालिकेतील सर्व सामने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचा भाग असणार आहेत.

या मालिकेची सुरुवात होण्यास अजून २० दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच यजमान दक्षिण आफ्रिका संघाने त्यांच्या २१ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. (South Africa 21 Members Squad)

दक्षिण आफ्रिकेने घोषित केलेल्या २१ सदस्यीय संघात, जून २०२१ मधील वेस्ट इंडिज दौऱ्याचा भाग असलेल्या जवळजवळ सर्व दक्षिण आफ्रिकी खेळाडूंना जागा देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डुआन ऑलिव्हियर याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याच्या येण्याने दक्षिण आफ्रिका संघाचे वेगवान गोलंदाजी युनिट अजूनच मजबूत झाले आहे.

त्याच्याबरोबरच भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि ऍन्रिच नॉर्किए यांनाही संघात सहभागी करण्यात आले आहे. त्यामुळे हे मातब्बर खेळाडूही भारताविरुद्ध कसोटी संघात पुनरागमन करतील. ग्लेंटन स्टुरमन आणि प्रिनेलन सुब्रेन यांनाही पुन्हा कसोटी संघात मिळाली आहे. याखेरीज सिसांडा मगला आणि रायन रिकेल्टन यांना पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात जागा मिळाली आहे.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ-
डीन एल्गार (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कागिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, ऍन्रिच नॉर्किए, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन. काइल वेरेन, मार्को जॅनसेन, ग्लेंटन स्टुअरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन, डुआन ऑलिव्हियर.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे बदललेले वेळापत्रक:
पहिली कसोटी: २६-३० डिसेंबर, सेंच्युरियन
दुसरी कसोटी: ३-७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरी कसोटी: ११-१५ जानेवारी, केपटाऊन

महत्त्वाच्या बातम्या-

अश्विनने सांगितलं आणि एजाजचं अनेक १० वर्ष रखडलेलं काम झटक्यात झालं

आयपीएल फ्रँचायझीच्या प्रशिक्षणाची सूत्रे हाती घेण्यासाठी शास्त्री सज्ज; म्हणाले, ‘मला १०० टक्के प्रशिक्षक…’

फक्त एजाज-रचिनच नव्हे, तर ‘या’ ४ भारतीय वंशाच्या क्रिकेटर्सने टीम इंडियाला टाकले आहे अडचणीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---