सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व करत आहे. कर्णधाराने मंगळवारी (12 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. तसेच रिंकू सिंग यानेही फिनिशरच्या रुपात सर्वाधिक धावांचे योगदान दिले. पावसामुळे भारतीय संघाचा डाव 19.3 षटकात थांबवला गेला. यादरम्यान संघाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 180 धावांपर्यंत मजल मारली.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ऍडेन मार्करम याने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासाठी रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकांचे योगदान दिले. रिंकूने अवघ्या 39 चेंडूत 68 धावांची अप्रतिम खेळी केली. हे टी-20 आंतरराष्ट्रीयमधील त्याचे पहिलेच अर्धशतक ठरले. तसेच सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 56 धावांची खेळी करून विकेट गमावली. त्याव्यतिरिक्त तिलक वर्मा याने 20 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले.
भारताची धावसंख्या अवघी 6 असताना पहिल्या संघाने दोन विकेट्स गमावल्या. सलामीवीर जशस्वी जयसवाल आणि शुबमन गिल यांनी शुन्यावर विकेट्स गमावल्या. तीन, चार आणि पाचव्या क्रमांकावर आलेल्या तिलक, सूर्यकुमार आणि रिंकू यांनी संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले. साहाव्या क्रमांकावर आलेल्या जितेश शर्माने एक धाव, सातव्या क्रमांकावर आलेल्या रविंद्र जडेजा याने 19 धावा, तर त्यानंतर आलेला अर्शदीप सिंग शुन्यावर बाद झाला.
जेराल्ड कोएत्झी याने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ऍडेन मार्करम, तबरेझ शम्सी, लिझाद विल्यम्स आणि मार्को जेनसन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. भारताने 180 धावा केल्या असल्या, तरी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 152 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला हे लक्ष्य 15 षटकांमध्ये गाठायचे आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका – मॅथ्यू ब्रेट्झके, रीझा हेंड्रिक्स, ऍडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसन, अँडीले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी.
महत्वाच्या बातम्या –
SAvsIND 2nd T20i । ऍडेन मार्करमने जिंकली नाणेफेक, दक्षिण आफ्रिका करणार प्रथम गोलंदाजी
मोठी बातमी! आयसीसी 2024 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, महाराष्ट्राच्या दोघांना संधी