भुवनेश्वर। कलिंगा येथे सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात प्रथमच 16 संघ सहभागी झाले आहेत. या संघांचे चार गट करण्यात आले आहे.
पहिल्या सामन्यात यजमान भारताने दक्षिण आफ्रिकेवर 5-0 असा मोठा विजय मिळवत स्पर्धेला उत्तम सुरूवात केली.
याच स्पर्धेत भाग घेतलेला दक्षिण आफ्रिका सहाव्यांदा विश्वचषकात खेळत असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांच्या खेळाडूंनी स्वखर्च केला आहे.
“आम्ही विश्वचषक खेळण्यास तयार आहोत पण त्यासाठी खेळाडूंना स्वत:चा खर्च करावा लागत आहे. काही प्रायोजक आहेत मदत करायला पण ती रक्कमही अपूरी पडत आहे”, असे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क हॉपकिन्स ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी म्हणाले.
“दक्षिण आफ्रिकेचा संघ बाकीच्या संघापेक्षा कमी सामने खेळला आहे. त्यामुळे कसोटी सामने खेळण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे”, असेही हॉपकिन्स पुढे म्हणाले.
जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानावर असलेला दक्षिण आफ्रिकेचा युस्टस जेथ्रोवर अधिक भरवसा आहे. त्याने 2017च्या आफ्रिकन नेशन हॉकी कपच्या अंतिम फेरीत गोल केला होता.
दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामना 2 डिसेंबरला कॅनडा विरुद्ध आहे. कॅनडाही त्यांच्या पहिल्या सामन्यात बेल्जियम विरुद्ध 2-1 असा पराभूत झाला आहे. यामुळे स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर दोन्ही संघांना हा सामना जिंकणे जरूरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टी२० जागा न मिळालेल्या धोनीची या स्पर्धेत चमकदार कामगिरी
–Video: कर्णधार विराट कोहलीने विकेट घेत केले असे जबरदस्त सेलिब्रेशन
–आॅस्ट्रेलियात भारतीय सलामीवीरांची धमाकेदार कामगिरी