दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात समोरासमोर आले आहेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा धमाकेदार फलंदाजी केली. क्विंटन डी कॉक यांनी झळकावलेल्या तुफानी 174, हेन्रिक क्लासेन याच्या 90 व कर्णधार ऐडन मार्करम याच्या अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी बांगलादेशसमोर 383 धावांचे आव्हान ठेवले.
🇿🇦 Quinton de Kock led the charge against the Tigers with an unassailable 174 runs. Heinrich Klaasen was on a rampage of 90 runs off 49 balls
Great effort from the boys 💪
🇧🇩 need 383 runs to win #CWC23 #BePartOfIt #SAvBAN pic.twitter.com/1UBRnZcTMu
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 24, 2023
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने घेतला. मात्र, त्यांनी आपले सुरुवातीचे दोन बळी लवकर गमावले. पहिल्या दहा षटकात केवळ 44 धावा गेल्यानंतर डी कॉक व कर्णधार मार्करम ही जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 131 धावा काढल्या मार्ग अर्धशतकी खेळी करून बाद झाला.
मात्र, आपला 150 वा आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळत असलेल्या डी कॉक याने या सामन्याला अविस्मरणीय बनवत स्पर्धेतील तिसरे शतक पूर्ण केले. त्याने क्लासेन याला साथीला घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव पुढे नेला. त्यांनी चौथ्या गड्यासाठी 132 धावांची भागीदारी केली. डी कॉकने 140 चेंडूमध्ये 174 धावांची खेळी केली. यामध्ये पंधरा चौकार व सात षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने क्लासेनने 49 चेंडूत 90 धावांची आतिषबाजी केली. अखेरीस मिलरने देखील नाबाद 34 धावा करत संघाला 282 पर्यंत पोहोचवले.
(South Africa Post 382 Against Bangaladesh De Kock Klassen shines)