---Advertisement---

IND vs SA: सलग 4 विजयानंतर टीम इंडियाच्या पदरी पराभव! सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा इंडियावर 76 धावांनी विजय

On: रविवार, फेब्रुवारी 22, 2026 10:38 PM
---Advertisement---

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज सुपर-8 मधील दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार खेळी करत हा सामना 76 धावांनी जिंकला. सुरूवातीला त्यांची सुरुवात चांगली झाली नव्हती. अवघ्या 20 धावांत त्यांचे 3 खेळाडू बाद झाले होते, पण त्यानंतर डेव्हिड मिलर (63) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (45) यांनी संघाला 175 पर्यंत पोहोचवत शानदार खेळी केली. त्याचबरोबर ट्रिस्टन स्टब्सने 44 धावा केल्या.

धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ सुरवातीपासूनच कोलमडला. ईशान किशन खात न उघडता बाद झाला तर तिलक वर्मा अवघ्या एका धावेवर बाद याचबरोबर अभिषेक शर्माने पुन्हा चाहत्यांना निराश केले तो 15 धावा करून बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव देखील काही खास करू शकला नाही.

टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली. त्याने 3 विकेट्स घेतल्या तर अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिका संघाकडून मार्को जॉन्सन 2, केशव महाराज 3, कॉर्बिन बॉशने 2 विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 2024 विश्वचषकातील अंतिम सामन्याचा बदला टीम इंडियाकडून घेतला आहे. या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच एका वेगळ्या उंचीवर वाढलेला दिसणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---