दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (१७ मे) भारत दौर्यावरील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी संघ निवड जाहीर केली. टेंबा बवुमाच्या नेतृत्वात १६ सदस्यीय संघ भारतात खेळेल. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघात बेबी एबी नावाने प्रसिद्ध असलेला डेवाल्ड ब्रेविस याचा समावेश केला जाईल अशी शक्यता होती. मात्र, त्याला संधी मिळू शकली त्याच्याऐवजी नुकतेच आयपीएल पदार्पण केलेल्या ट्रिस्टन स्टब्सची निवड झाली.
संघात मोठ्या नावांचा समावेश
आयपीएलनंतर ९ जूनपासून दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात भारतातील विविध शहरांमध्ये पाच सामन्याची टी२० मालिका होईल. सध्या दक्षिण आफ्रिकेचे अनेक प्रमुख खेळाडू भारतात आयपीएल खेळत आहेत. त्या खेळाडूंना या मालिकेसाठी संधी दिली गेली. क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रॅसी व्हॅन डर डसेन आणि मार्को जेन्सन हे आयपीएल खेळणारे क्रिकेटर यात समाविष्ट आहेत. त्याचबरोबर हेन्रीक क्लासेन व रिझा हेंड्रिक्स यांना देखील पुनरागमनाची संधी दिली गेली. अनुभवी अष्टपैलू वेन पार्नेल २०१७ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय टी२० खेळताना दिसेल.
ब्रेविसला नाही दिली गेली संधी
या वर्षीच्या सुरुवातीला अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी केलेला व बेबी एबी नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविस याला मात्र संघातील जागा नाकरण्यात आली. ब्रेविस सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळत आहे. मात्र, त्याचवेळी अगदी काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स संघात सामील झालेला व आयपीएल पदार्पण केलेला यष्टीरक्षक ट्रिस्टन स्टब्सची संघात निवड झाली. २१ वर्षीय ट्रिस्टन आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका ९ जून रोजी दिल्लीत सुरू होईल. उर्वरित सामने अनुक्रमे कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बेंगळुरू येथे होतील.
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ-
टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एन्रिक नॉर्कीए, वेन पार्नल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी वॅन डर डसेन, मार्को जॅन्सन.
महत्वाच्या बातम्या-
एमएस धोनी आणि गॅरी कर्स्टनला एकत्र पाहून सुखावले फॅन्स; पाहा खास व्हिडिओ
फक्त १० सामन्यांत चहल मोडणार विराटचा ९७३ आयपीएल धावांचा विक्रम? पाहा नक्की काय आहे प्रकरण
मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमारची जागा मिळालेला आकाश मधवाल आहे कोण? जाणून घ्या कामगिरी