पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात कसोटी आणि टी-20 सामन्याची मालिका 26 जानेवारी पासून खेळली जाणार आहे. या दोन मालिकेचे आयोजन पाकिस्तान मध्ये केले आहे. यापैकी दोन सामन्याची कसोटी मालिका अगोदर खेळली जाईल. त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ पाकिस्तानमध्ये दाखल झाला आहे. त्यांना या मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी क्वारंटाइन होवून इतर कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागेल.
दक्षिण आफ्रिका संघ 14 वर्षांनंतर पाकिस्तान दौर्यावर आला आहे. पाकिस्तान मध्ये आलेल्या दक्षिण आफ्रिका संघात 21 सदस्य आहेत. त्याचबरोबर या संघाचे नेतृत्व क्विंटन डी कॉक कडे आहे. या सर्व खेळाडूंना हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये आयसोलेशन मध्ये रहावे लागेल. त्यानंतर त्याची कोरोना व्हायरसची चाचणी घेतली जाईल. त्याचबरोबर या चाचणीचे अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना सराव शिबिराला सुरुवात करता येणार नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सराव सत्र आयोजित करण्याची परवानगी दिली जाईल.
Touchdown Karachi! 🇵🇰🏏🇿🇦 #Proteas #SeeUsOnThePitch pic.twitter.com/DORzYCEl1X
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 16, 2021
दक्षिण आफ्रिका संघ :
क्विंटन डी कॉक (कर्णधार), टेम्बा बावुमा, एडेन मार्करम, फाफ डू प्लेसिस, डीन एल्गर, कगिसो रबाडा, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, लुंगी एंगिडी, रैसी वैन डर हुसेन, एनरिक नॉर्टजे, वियान मुल्डर, लूथो सिपाम्ला, ब्युरेन हैंड्रीक्स, कायल वेरेयने, सैरल एरवी, कीगन पीटरसन, तबरेज शम्सी, जॉर्ज लिंडे, डॅरिन डुपाविलन, अॉटनिल बार्टमॅन,
पाकिस्तानचा कसोटी संघ :
बाबर आझम (कर्णधार) मोहम्मद रिजवान, आबिद अली, इमरान बट, अझर अली, फवाद आलम, सरफराज अहमद, फहीम अशरफ, यासिर शाह, शाहीन आफ्रिदी, अब्दुल्ला शफीक, आगा सलमान, सऊद शकील, कामरान गुलाम, साजिद खान, हॅरिस रऊफ, तबिश खान, नौमान अली, हसन अली आणि मोहम्मद नवाज.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका:
पहिला कसोटी सामना – 26 ते 30 जानेवारी – कराची
दुसरा कसोटी सामना – 4 ते 8 फेब्रुवारी – रावळपिंडी
टी-20 मालिका:
पहिला सामना – 11 फेब्रुवारी – लाहोर
दुसरा सामना – 13 फेब्रुवारी – लाहोर
तिसरा सामना – 14 फेब्रुवारी – लाहोर