भारतीय संघ सध्या न्यूझीलंडसोबत कसोटी मालिका खेळत आहे. पुढच्या महिन्यात भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर भारताला कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायच्या आहेत. मात्र, अशातच आता दक्षिण अफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आढळला आहे. त्यामुळे भारताच्या या दौऱ्यावर संशय निर्माण झाला आहे. भारत अ संघ देखील सध्या दक्षिण अफ्रिकेत आहे. ठरल्याप्रमाणे भारतीय संघ डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या दौऱ्यावर जाणार होता, पण आता याबाबत चित्र अस्पष्ट दिसत आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे.
जगभारतीय इतर अनेक देशही सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्याच्या विचारत आहेत. पण इनसाइडस्पोर्ट्सच्या माहितीनुसार, त्याठिकाणी कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडल्यानंतर सरकारकडून हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. भारतीय संघाच्या पुढच्या महिन्यातील दक्षिण अफ्रिका दौऱ्याबाबत बीसीसीआयच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे भारतीय संघाच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात अद्याप कसलाही बदल झालेला नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, “आत्तासाठी या कार्यक्रमात कोणताच बदल होणार नाही. दौरा ठरलेल्या वेळेप्रमाणे होईल. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि सीएसएच्या संपर्कात आहोत. अशा कठीण वेळी, आपण फक्त आशा करू शकतो की, गोष्टी नियंत्रणात असतील, जेव्हा भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेसाठी रवाना होईल.”
दरम्यान, ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भारत आणि दक्षिण अफ्रिकेत सरुवातील कसोटी मालिका खेळली जाईल. कसोटी मालिकेतील पहिला सामना १७ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आता आमरे सरांना डिनरसाठी बोलवू शकतो’, पदार्पणातील शतक करत श्रेयस अय्यरने पाळला शब्द
पहिल्या कसोटीदरम्यान भारतीय पंचांचे निराशाजनक निर्णय, न्यूझीलंडचा सलामीवीर तीन वेळा बचावला
South Africa A vs India A: पहिल्या कसोटी पावसामुळे अनिर्णित; इश्वरनचे शानदार शतक, तर ९६ धावा