---Advertisement---

या कारणामुळे डिविलियर्सला विश्वचषकासाठी संधी दिली नाही, दक्षिण आफ्रिका बोर्डाने केला मोठा खूलासा

On: शुक्रवार, जून 7, 2019 5:12 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा संघ संघर्ष करत आहे. त्यांना पहिल्या तीनही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. असे असतानाच दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सने विश्वचषकात खेळण्याची दिलेल्या ऑफरला दक्षिण आफ्रिका बोर्डाने नकार दिल्याचा खूलासा झाला आहे.

डिविलियर्सने मागीलवर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो निवृत्तीनंतर एक वर्षांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करुन 2019 विश्वचषक खेळण्यासाठी इच्छित होता. याबाबतीत त्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, मुख्य प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांना कल्पना दिली होती.

पण विश्वचषकासाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ निवडीच्या काही वेळापूर्वी निवड समितीला ही बातमी कळाली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा धक्का होता. पण त्यांनी नैतिकतेचे व तत्त्वांचे पालन करत डिविलियर्सला नकार दिला होता.

याबाबत निवड समितीचे संयोजक लिंडा झोंडी यांनी सांगितले की ‘फाफ डु प्लेसिसि आणि ओटीस गिब्सन यांनी डिविलियर्सची संघात येण्याची इच्छा 18 एप्रिलला आम्हाला सांगितली. त्यादिवशी आम्ही विश्वचषकासाठी संघ घोषित करणार होतो. ही गोष्ट आमच्यासाठी धक्कादायक होती.’

‘एबी जेव्हा निवृत्त झाला तेव्हा मोठी पोकळी निर्माण झाली होती. आमच्याकडे त्याची कमी भरुन काढणारे खेळाडू शोधण्यासाठी एक वर्षांचा कालावधी होता. आमच्याकडे असे खेळाडू होते ज्यांनी मेहनत घेतली होती. त्यामुळे ते विश्वचषकासाठी संघात स्थान मिळण्यास पात्र होते. आम्ही हा निर्णय तत्वांना धरुन घेतला होता. आम्हाला संघाशी, निवड समीतीशी आणि खेळाडूंशी न्याय्य रहायचे होते.’

‘त्याने निवृत्ती घेतल्यानंतर एक वर्षानी निवडीसाठी उपलब्ध राहण्यात काहीच अर्थ नव्हता. विश्वचषकासाठी आधीच संघ निश्चित झाला होता आणि संघ घोषित करण्याच्या दिवशी मला ही बातमी कळाल्याने माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता.’

‘एबी हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पण आम्हाला आमच्या तत्वांचे आणि नैतिकतेचे पालन करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे आमच्या निर्णयाचा खेद वाटत नाही.

त्याचबरोबर झोंडी पुढे म्हणाले, ‘मी एबी डिविलियर्सला 2018 मध्ये निवृत्ती न घेण्याबाबत विनंती केली होती. त्यावेळी असा समज होता की तो निवडक सामने खेळत होता. पण ते खरे नाही. मी त्याला पर्याय दिला होता की विश्वचषकात ताजेतवाने राहण्यासाठी त्याचा या कालावधीतील मोसमाचे तसे नियोजन केले जाईल.’

‘आम्ही स्पष्ट केले होते की त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध खेळायला हवे होते, जेणेकरुन आम्ही त्याचा विश्वचषकासाठी संघात निवड करण्याबाबत विचार करु. पण त्याने अनुक्रमे पाकिस्तान आणि बांगलादेश प्रीमयर लीग खेळण्याचा करार केला. त्याने त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगून आमची ऑफर नाकारली.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषक २०१९ : …तर ख्रिस गेल आउट झाला नसता!

संपूर्ण वेळापत्रक: असा असेल टीम इंडियाचा जानेवारी २०२० मध्ये होणारा न्यूझीलंड दौरा

विश्वचषक २०१९: अफगाणिस्तानचा हा महत्त्वाचा खेळाडू विश्वचषकातून बाहेर, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment