वनडेतील सर्वोत्तम ऑस्ट्रेलिया संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी20 मालिका आणि 5 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. टी20 मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली. त्यानंतर आता उभय संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (दि. 12 सप्टेंबर) पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 111 धावांनी विजय झाला. या विजयासह यजमान संघाने मालिकेत पुनरागमन केले. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत ऑस्ट्रेलिया 2-1ने आघाडीवर आहे.
तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, दक्षिण आफ्रिका संघाच्या फलंदाजांनी कर्णधार मिचेल मार्श (Mitchell Marsh) याचा निर्णय चुकीचा ठरवला. यजमान संघाचा सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि कर्णधार टेम्बा बावूमा (Temba Bavuma) यांनी पहिल्या विकेटसाठी 146 धावांची भागीदारी रचत संघाला शानदार सुरुवात करून दिली. डी कॉक 77 चेंडूत 82 धावा करून बाद झाला. तसेच, बावूमाने 62 चेंडूत 57 धावांची खेळी साकारली.
मात्र, त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एडेन मार्करम (Aiden Markram) याने 74 चेंडूत नाबाद 102 धावांची झंझावाती शतकी खेळी साकारली. यामुळे दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकात 6 विकेट्स गमावत 338 धावा केल्या. या फलंदाजांव्यतिरिक्त रीझा हेंड्रिक्सने 39 आणि मार्को यान्सेन याने 16 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ट्रेविस हेडने 2 विकेट्स, तर नेथन एलिस, तन्वीर संघा आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
https://twitter.com/ProteasMenCSA/status/1701656366446760009
दक्षिण आफ्रिकेच्या 339 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानेही चांगली सुरुवात केली. सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याने 56 चेंडूत 78 धावा आणि ट्रेविस हेड याने 24 चेंडूत 38 धावांची खेळी साकारली. या दोघांनंतर मिचेल मार्शने सर्वाधिक 29 धावांची खेळी साकारली. इतर एकही फलंदाज 20पेक्षा जास्त धावा करू शकला नाही आणि संपूर्ण संघ 34.3 षटकात 227 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 111 धावांनी पराभवाचा धक्का दिला.
दक्षिण आफ्रिका संघाकडून गोलंदाजी करताना गेराल्ड कोएट्जी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. या विकेट्स त्याने 6.3 षटकात 50 धावा खर्चून नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त तबरेज शम्सी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, सिसांडा मगाला याने 1 विकेट घेतली. या सामन्यातील शतकी कामगिरीसाठी मार्करमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या वनडे मालिकेतील अखेरचे दोन सामने 15 आणि 17 सप्टेंबर रोजी खेळले जातील. (south africa vs australia 3rd odi match report sa vs aus david warner score 78)
हेही वाचा-
ही दोस्ती तुटायची नाय! श्रीलंकेविरुद्ध पाहायला मिळाला रोहित-विराटचा ब्रोमान्स; एकमेकांवर प्रेमाची उधळण- Video
Final गाठताच रोहितकडून एक विकेट घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजाचे कौतुक; म्हणाला, ‘असं वाटलं तो प्रत्येक बॉलवर…’




