---Advertisement---

आंद्रे रसलची एक चूक अन् वेस्ट इंडिज विश्वचषकातून बाहेर!

On: सोमवार, जून 24, 2024 2:46 PM
---Advertisement---

यंदाच्या टी20 विश्वचषकात गट-2 च्या सुपर 8 मधील शेवटच्या सामन्यात यजमान संघास दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 विकेट्स पराभवास सामोरे जावे लागले. तसेच या परभवामुळे वेस्ट इंडिज संघ यंदाच्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडले आहे. या चुरशीच्या सामन्यत दक्षिण आफ्रिकेने गट-2 मधून सेमी फायनल साठी पात्र ठरला आहे. तर या गटातून इंग्लंड आधीच सेमी फायनलसाठी पात्र ठरला आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजचे खेळाडू त्यांच्या घरच्या चाहत्यांसमोर खूप भावूक दिसले. पण कॅरेबियन संघाची चूक कुठे झाली? रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाला पराभवाचा सामना का करावा लागला? वास्तविक, सोशल मीडियावरील चाहत्यांचा असा विश्वास आहे की आंद्रे रसेलच्या चुकीने वेस्ट इंडिजला विश्वचषकातून बाहेर काढले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

कागिसो रबाडा दक्षिण आफ्रिकेसाठी डावातील 18 वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अकिल हौसेन स्ट्राइकवर होता, त्याने शॉट खेळला, यानंतर अकिल हौसेन धाव घेण्यासाठी धावला, पण आंद्रे रसेल धोक्याच्या बाजूला धावत होता. मात्र, ॲनरिक नॉर्किया थेट थ्रोमुळे आंद्रे रसेलला धावबाद व्हावे लागले. त्यामुळे सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूस झुकला. जर आंद्रे रसेल शेवटच्या षटकापर्यंत खेळला असता तर कदाचित वेस्ट इंडिजला 150 धावांपर्यंत मजल मारता आली असती, असे झाले असते तर सामन्यांचा निकाल वेगळा लागला असता.

आंद्रे रसेल धावबाद झाल्याचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करुन आपली प्रतिक्रिया देत आहेत. या चुरशीच्या सामन्यातील विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

महत्तवाच्या बातम्या-

दुर्दैवी! इरफान पठाणच्या जवळच्या व्यक्तीचा वेस्ट इंडिजमध्ये मृत्यू, स्विमिंग पूलमध्ये आढळला मृतदेह
टी20 विश्वचषकात 2007 पासून चालू आहे हा ट्रेंड, यंदाही झाला खरा!
अफगाणिस्तानच्या पठ्ठ्यांनी करुन दाखवलं, रोहित शर्माचे धुरंधर करणार का हिशोब चुकता?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---