सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिकेने आज भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत ३ सामन्यांची कसोटी मालिकेतही २-० अशी विजयी बाधत घेतली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला १३५ धावांनी पराभूत केले. लुंगी एन्गिडी या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने दुसऱ्या डावात ६ बळी घेतले.
आज पहिल्या सत्रातच भारताने ७ बळी गमावले. त्यामुळे भारतावर जवळ जवळ तीन वर्षांनी कसोटी मालिकेत पराभूत होण्याची नामुष्की आली आहे. दुसऱ्या डावात भारतासमोर जिंकण्यासाठी २८७ धावांचे आव्हान होते.
भारताकडून या डावात रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. परंतु त्यालाही त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयश आले. रोहितने ७४ चेंडूत ४७ धावा केल्या. त्याला मोहम्मद शमीने(२८) चांगली साथ दिली होती. परंतु रोहित बाद झाल्यानंतर शमीची लगेच बाद झाला.
त्याआधी भारताने आज ३ बाद ३५ धावांपासून खेळायला सुरुवात केली. पहिल्या डावाप्रमाणे या डावतही चेतेश्वर पुजारा(१९) धावबाद झाला. यानंतर ठराविक काळानंतर पार्थिव पटेल(१९), हार्दिक पंड्या(६), आर अश्विन(३) यांनी देखील आपले बळी गमावले.
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी(६/३९) आणि कागिसो रबाडा(३/४७) या दोन गोलंदाजांनीच बळी घेत भारताचा डाव १५१ धावत संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक:
दक्षिण आफ्रिका पहिला डाव: सर्वबाद ३३५ धावा
भारत पहिला डाव: सर्वबाद ३०७ धावा
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव: सर्वबाद २५८ धावा
भारत दुसरा डाव: सर्वबाद १५१ धावा
सामनावीर: लुंगी एन्गिडी