दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना डरबनच्या किंग्समीड मैदानावर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण अफ्रिका संघाने बाजी मारली आणि बांगलादेशी फलंदाजांच्या दांड्या उडवल्या. सामन्याच्या दुसऱ्या डावात बांगलादेशी फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. या डावात बांगलादेश संघ अवघ्या ५३ धावांवर गुंडाळला गेला आणि दक्षिण अफ्रिका संघ २२० धावांनी विजयी ठरला. यासह त्यांनी कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर बांगलादेश (Bangladesh) संघाचा कर्णधार मोमिनुल हकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरल्यानंतर दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने १२१ षटके खेळून काढली आणि ३६७ धावा केल्या. यामध्ये त्यांच्या तेंबा बावुमाने सर्वाधिक ९३ आणि कर्णधार डीन एल्गरने ६७ धावा केल्या. सॅरेल एर्वीने ४१ धावा केल्या, तसेच रन हार्मरने ३८ धावांचे योगदान दिले. बांगलादेशसाठी खलीद अहमदने पहिल्या डावात सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच महिदी हसनने ३ आणि इबादत हुसेनने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर पहिल्या डावात बांगलादेशनेही चांगले प्रदर्शन केले. महमदूल हसन जॉयने सर्वाधिक १३७ धावांचे योगदान दिले, परंतु संघ २९८ धावा करून सर्वबाद झाला. जॉयच्या शतकी खेळीव्यतिरिक्त बांगलादेशसाठी लिटन दासने ४१ आणि नजमुल हसनने ३८ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकी गोलंदाज सिमोन हार्मरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच लिजाड विलियम्सला ३ विकेट्स मिळाल्या. अशा प्रकारे बांगलादेश संघ पहिल्या डावानंतर ६९ धावांनी पिछाडीवर होता.
Bangladesh have been bowled out for their second-lowest total in Tests!
South Africa win by 220 runs and go 1-0 up in the two-match series 👏
#WTC23 | #SAvBAN | https://t.co/cUjJUjqSna pic.twitter.com/RLqxfkChk7— ICC (@ICC) April 4, 2022
त्यानंतर दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिका संघ २०४ धावा करून सर्वबाद झाला आणि बांगलादेशला विजयासाठी २७४ धावांचे लक्ष्य मिळाले. परंतु बांगलादेश संघ सामन्याच्या शेवटच्या डावात असा कोलमडला की, पुन्हा सावरू शकला नाही. अवघ्या ५३ धावा करून सर्व बांगलादेशी खेळाडू तंबूत परतले आणि दक्षिण अफ्रिका संघाने २२० धावांनी विजय मिळवला. फिरकी गोलंदाज केशव महाराजने बांगलादेशच्या ७ खेळाडूंना त्याच्या फिरकीच्या जाळ्यात आडकवले आणि तंबूचा रस्ता दाखवला. तसेच सिमोन हार्मरनेही ३ विकेट्स घेतल्या.
आता दक्षिण अफ्रिका विरुद्ध बांगलादेश कसोटी मलिकेचा (South Africa vs Bangladesh Test Series) दुसरा सामना पोर्ट एलिझाबेथमध्ये ६ एप्रिलपासून खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
पंजाबच्या यष्टीरक्षकाने पदार्पणातच दाखवली हुशारी अन् बाद झाला धोनी, पाहा Video
IPL2022| हैदराबाद वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
धोनीने तब्बल १२ वर्षे पंजाबविरुद्ध न केलेला तो नकोसा विक्रम जडेजाने तिसऱ्याच सामन्यात केला