आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (ICC Women ODI World Cup) १६ वा सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (NZW vs SAW) यांच्यात झाला. हॅमिल्टनच्या सेडन पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४७.५ षटकात २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३ चेंडू शिल्लक असताना ८ विकेट्सच्या नुकसानावर त्यांचे लक्ष्य पूर्ण केले आणि २ विकेट्स राखून हा सामना जिंकला. दक्षिण आफ्रिका संघासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला (South Africa’s Historic Win) आहे.
असा झाला सामना
न्यूझीलंडच्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर लॉरा वोल्वार्ड हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने ९४ चेंडूंमध्ये ६ चौकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त कर्णधार सने लूस हिनेही ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच मरिझाने कॅप हिनेही डावाखेर नाबाद राहात ताबडतोब ३४ धावा जोडल्या. परिणामी ४९.३ षटकांमध्येच २ विकेट्स बाकी असताना दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचे आव्हान पूर्ण केले.
न्यूझीलंडकडून ऍमेलिया केर हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर फ्रान्सेस मॅके हिनेही दक्षिण आफ्रिकेच्या २ फलंदाजांना बाद केले.
Take a bow, Marizanne Kapp 🔥
In a pressure chase against New Zealand, she guides South Africa to their fourth win in as many games in #CWC22 👏 pic.twitter.com/qZEtAw5XuL
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 17, 2022
तत्पूर्वी न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डिवाइन हिने ९३ धावांची शानदार खेळी केली होती. १०१ चेंडू खेळताना १ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने तिने या धावा केल्या होत्या. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या अयाबोंगा खाका हिने सोफीला ९३ धावांवर त्रिफळाचीत करत तिच्या शतकी खेळीवर पाणी फेरले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ऍमेलिया केर हिनेही ४२ धावा फटकावल्या होत्या.
या डावात दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माइल, अयाबोंगा खाका यांनी शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले होते. त्यांनी दोघींनी मिळून न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत धाडला होता. शबनीमने ३ तर अयाबोंगाने ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच मरिझाने कॅप हिनेही २ विकेट्सचे योगदान दिले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे न्यूझीलंडचा संघ ४८ षटकांमध्येच सर्वबाद झाला होता.
South Africa have beaten New Zealand for the first time in a Women's Cricket World Cup encounter 🔥 #CWC22 pic.twitter.com/4LrJTVKmhK
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 17, 2022
दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास
हा सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने वनडे विश्वचषकात न्यूझीलंडवर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. यापूर्वी २०००, २००९ आणि २०१३ मध्ये उभय संघांमध्ये झालेल्या वनडे विश्वचषक सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात केली होती.
तसेच महिला अणि पुरुष वनडे विश्वचषकामध्येही दक्षिण आफ्रिकेने २१ व्या शतकात न्यूझीलंडवर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाला २००३, २००७, २०११, २०१५ आणि २०१९ मध्ये न्यूझीलंडच्या हातून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
जुन्नरचा कौशल तांबे दिल्ली कॅपिटल्स संघासाठी निभावणार महत्त्वाची जबाबदारी
‘बेबीसिटर’ पंत! संघ-सहकाऱ्याच्या मुलासोबत खेळताना दिसला टोपीचा अनोखा खेळ, पाहा क्यूट व्हिडिओ
युझवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्सचे ट्वीटर अकाउंट केले हॅक? स्वत:लाच फ्रँचायझीचा बनवले नवा कर्णधार