भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना मंगळवारी (12 डिसेंबर) सेंट जॉर्ज पार्कवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारताला पहिल्या सामन्यात पावसामुळे खेळता आले नाही. दुसऱ्या सामन्यावर देखील पावसाचे सावट होते. पण सुदैवाने वेळेत नाणेफेक पार पडली. आफ्रिकी संघाचा कर्णधार ऍडेन मार्करम याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
सलामीवीर ऋतुराज गायकवाड याची तब्येत बिघडल्यामुळे त्याने दुसऱ्या टी-20 सामन्यातून माघार घेतली. तसेच रवी बिश्रोई विश्रांतीवर असून कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.
South Africa won the toss & decided to bowl first. pic.twitter.com/K3JRZsHKGp
— Johns. (@CricCrazyJohns) December 12, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका – मॅथ्यू ब्रेट्झके, रीझा हेंड्रिक्स, ऍडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, अँडीले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी
(South Africa won the toss and opted to bowl first against India)
महत्वाच्या बातम्या –
विराट की बाबर, कोणाचा कव्हर ड्राइव्ह भारी? अफगाणिस्तान फलंदाजाने घेतले ‘या’ खेळाडूचे नाव
उध्वस्थ व्हाल! भारत दौऱ्यावर इंग्लंडने करू नये ‘ही’ चूक, माजी दिग्गजाचा थेट इशारा