वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 15 वा सामना मंगळवारी (17 ऑक्टोबर) खेळला जाईल. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान हा सामना खेळला जाईल. तत्पूर्वी, उभय संघादरम्यान झालेल्या नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिका संघाच्या बाजूने आला. कर्णधार टेंबा बवुमाने यासह प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
Toss news from Dharamsala 📰
South Africa win the toss and elect to bowl first 🏏#SAvNED 📝: https://t.co/guZPmcKD4N pic.twitter.com/dkIQyWL9FD
— ICC (@ICC) October 17, 2023
दक्षिण आफ्रिका संघाने स्पर्धेत आपली सुरुवात अत्यंत धमाकेदार केली आहे. श्रीलंकेविरुद्ध 427 धावांचा विश्वविक्रमी पल्ला त्यांनी गाठला होता. त्या सामन्यात 99 धावांनी त्यांनी विजय मिळवला. तर, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यातचे काम त्यांनी केले. दुसऱ्या बाजूला नेदरलँड्सला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने त्यांना मात दिली.
या सामन्यासाठी दोन्ही संघांनी एक एक बदल आपल्या संघात केला. नेदरलँड्सने वेगवान गोलंदाज रायन क्लेन याच्या जागी अष्टपैलू लोगन वॅन बिक याला संघात स्थान दिले. तर, दक्षिण आफ्रिकेने फिरकीपटू तबरेझ शम्सीच्या जागी वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झे याला संधी दिली.
प्लेइंग इलेव्हन:
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, गेराल्ड कोएत्झे.
नेदरलँड्स
विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन वॅन बिक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन.
(South Africa Won Toss Against Netherlands 2023 ODI World Cup Elected Bat Field)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बदलली पॉईंट्स टेबलची स्थिती, पाहा कोण, कुठल्या स्थानी उभा?
विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का?