भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या टी२० मालिकेतील तिसरा आणि महत्त्वपूर्ण सामना मंगळवारी (१४ जून) खेळला जाणार आहे. विशाखापट्टनमच्या विजाग स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. यजमान भारतीय संघ ५ सामन्यांच्या या मालिकेत ०-२ने पिछाडीवर असल्याने त्यांच्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे.
भारतीय प्रणामवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ६.३० वाजता नाणेफेक झाली असून दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
विजयरथावर स्वार असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेला भारतीय संघही विनाबदल मैदानात उतरला आहे.
A look at the Playing XI for the 3rd #INDvSA T20I
Live – https://t.co/mcqjkC20Hg @Paytm https://t.co/quiGdAuBWZ pic.twitter.com/JdYsukd2Iw
— BCCI (@BCCI) June 14, 2022
असे आहेत दोन्हीही संघ-
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेन्रिच क्लासेन (यष्टीरक्षक), डेविड मिलर, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, तबरेझ शम्सी, ऍन्रिच नॉर्किया
भारत (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धावला.. गोंधळून थांबला.. खेळ खल्लास झाला..! विल यंग धावबाद, बेन स्टोक्सने दाखवली कमालीची चपळता
INDvsSA T20: कार्तिकच्या आधी अक्षर पटेल फलंदाजीला आल्याने भारताच्या माजी दिग्गजाने सुनावले खडे बोल
भारतीय संघ कुठे पडतोय कमी? खेळाडूंच्या दमदार वैयक्तिक प्रदर्शनानंतरही हातून निसटतोय सामना