भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी२० सामना शुक्रवारी (१७ जून) राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात पाहुणा दक्षिण आफ्रिका संघ २-१ ने आघाडीवर असल्याने भारतीय संघासाठी हा सामना करा अथवा मरा असणार आहे. भारताने हा सामना गमावल्यास मालिकाही हातून निसटेल. तर सामना जिंकल्यास भारतीय संघ मालिकेत २-२ अशी बरोबरी साधेल.
तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता उभय संघात नाणेफेक झाली असून पुन्हा दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्यात आले आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि पार्नेल यांना दुखापत झाल्याने ते या सामन्याला मुकणार आहेत. तसेच रिझा हेन्ड्रिक्स हादेखील सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यांच्या बदल्यात लुंगी एन्गिडी आणि मार्को जेन्सन यांना जागा देण्यात आली आहे. दुसरीकडे आनंदाची बातमी म्हणजे, यष्टीरक्षक आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक दुखापतीतून बरा झाला असून त्याचे पुनरागमन झाले आहे. भारतीय संघात मात्र कोणताही बदल केला गेलेला नाही.
असे आहेत दोन्हीही संघ
भारत- ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान
दक्षिण आफ्रिका- टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, मार्को जॅनसेन, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsSA T20: अर्शदीप की उमरान कोणाला मिळणार चौथ्या सामन्यात संधी? वाचा भारतीय दिग्गजाने काय सांगितले
पुणेकर ऋतुराज गायकवाडने उडवली युझवेंद्र चहलची खिल्ली, पाहा व्हिडीओ






टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा