वनडे विश्वचषक 2023चे उपांत्य सामने जवळपास निश्चित झाले आहेत. विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असण्याची पूर्ण शक्यता आहे. आता या सामन्याविषयी आफ्रिकी संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा यायची खास प्रतिक्रिया समोर येत आहे.
वनडे विश्वचषकाच्या 42व्या सामन्यात अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ आमने सामने होते. शुक्रवारी (10 नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 5 विकेट्स राखून विजय मिळवला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 244 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने 47.3 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर लक्ष्य गाठले आणि ग्रुप स्टेजचा शेवट गोड केला. ग्रुप स्टेजच्या 9 सामन्यांपैकी 7 सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ जिंकला, तर 2 सामन्यात पराभूत झाला आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानने 9 पैकी 4 सामन्यात विजय, तर 5 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. शुक्रवारच्या सामन्यात रासी वॅन डर ड्युसेन सामनावीर ठरला, ज्याने 76 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा () याने उपांत्य सामन्याबाबत खास प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “विजयामध्ये असेच सातत्य ठेवणार आहोत. याठिकाणी (अहमदाबाद) पुन्हा एकदा खेळताना मजा येईल. पण त्यासाठी कोलकातामध्ये ऑस्ट्रेलियन संघाच्या मोठ्या आव्हानाला आम्ही समोरे जाणार आहोत. जिंकणे ही एक सवय असते आणि आम्हाला हे सातत्य पुढेही कायम ठेवायचे आहे.”
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाची चोकर्स अशी ओळख आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही मोजक्या बलाढ्य संघांमध्ये त्याची गणना होते. पण अद्याप एकही विश्वचषक दक्षिण आफ्रिकेला जिंकता आला नाहीये. यावेळी दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषक जिंकणार की, पुन्हा एकदा चोकर्स ठरणार, हे पाहण्यासारखे असेल. (South African captain Temba Bavuma react on semi-final match against Australia)
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाची प्रथम गोलंदाजी, सेमीफायनलसाठी दोन स्टार खेळाडू विश्रांतीवर
ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारतीय फलंदाजाने लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट; म्हणाली, ‘या लिजेंड खेळाडूचा…’