भारत विरुद्ध नेदरलँड संघ एकमेकांविरुद्ध वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपला दुसरा सराव सामना खेळणार आहेत. हा सामना मंगळवारी (दि. 3 ऑक्टोबर) तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने नेदरलँडच्या खेळाडूंना टिप्स दिल्या. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेदरलँड क्रिकेट (Netherland Cricket) बोर्डाने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत डेल स्टेन (Dale Steyn) संघाच्या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीत सुधारणा करण्यासाठी टिप्स देताना दिसत आहे. यादरम्यान नेदरलँडच्या खेळाडूही स्टेन जे काही सांगत आहे, त्याकडे लक्ष देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत बोर्डाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अंदाज लावा की, कॉफीसाठी क्रीमी बीन्स कॅफेत कोण आलं आणि खेळाडूंसोबत खेळाविषयी आपले महत्त्वपूर्ण ज्ञान शेअर केले? स्वत: महान डेल स्टेन.”
भारताविषयी काय म्हणाला स्टेन?
डेल स्टेन या स्पर्धेत इंग्रजी समालोचक म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच त्याने सांगितले की, “मला वाटते, भारतीय संघ स्पर्धेचा अंतिम सामन्यात जागा बनवेल.” तसेच, दुसऱ्या संघाविषयी बोलताना स्टेन म्हणाला, “मला वाटते की, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना व्हावा. मात्र, मला इंग्लंड बाजी मारेल असं वाटतं.”
Guess who came down to the Creamy Beans Cafe for a Coffee and shared his immense knowledge of the game with the boys?
The legend @DaleSteyn62 himself. 🤩#CWC23 pic.twitter.com/BUcxeyAsdK
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) October 1, 2023
दिग्गज गोलंदाज आहे स्टेन
चाळिशी गाठलेल्या स्टेनची गणना दक्षिण आफ्रिका संघाच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये होते. त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 265 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 699 विकेट्स घेतले आहेत. दक्षिण आफ्रिका संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम शॉन पोलॉक याच्या नावावर आहे. त्याने 423 सामन्यात 829 विकेट्स घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला स्टेन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघात वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. याव्यतिरिक्त मेजर लीग क्रिकेटमध्ये तो वॉशिंग्टन फ्रीडम संघातही हीच भूमिका साकारत आहे. (south african legend dale steyn gave tips to the players of netherlands team ahead warm up match against india)
हेही वाचा-
CWC23: भारतीय संघाचे तिरुवनंतपुरम येथे पारंपरिक अंदाजात स्वागत, दुसऱ्या सराव सामन्यात नेदरलँडशी भिडणार
‘आम्ही सचिनसोबत जे केलं ते…’, विराट कोहलीचं नाव घेत सेहवागचे मोठे विधान