---Advertisement---

नेदरलँड्स सामन्यात वादळी खेळी करत सूर्यकुमार बनला सामनावीर; पुरस्कार घेताना म्हणाला, ‘लाओ भैय्या…’

On: शुक्रवार, ऑक्टोबर 28, 2022 5:10 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

भारतीय संघाने नेदरलँड्सविरुद्ध गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) खेळलेल्या टी20 विश्वचषकातील 23व्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादव याने विस्फोटक खेळी केली. त्याने विराट कोहली याच्यासोबत शानदार भागीदारी रचत संघाला सामना जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले. हा भारताचा सलग दुसरा विजय होता. सूर्यकुमार याला त्याच्या अफलातून फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारताना त्याने असे काही केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने टी20 विश्वचषकात खेळलेला पाकिस्तानविरुद्धचा पहिल्या सामन्यात फार काही कमाल केली नव्हती. त्याला फक्त 15 धावा करण्यात यश आले होते. मात्र, नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने दमदार फलंदाजी केली. त्याने नेदरलँड्सविरुद्ध फलंदाजी करताना 25 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. त्याच्या या खेळीमध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचाही समावेश होता. यावेळी त्याने विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत नाबाद 95 धावांची भागीदारी रचली. यामुळे संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश आले.

सामनावीर पुरस्कार घेताना सूर्यकुमारची मजेशीर रिऍक्शन
सूर्यकुमार यादव याला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. जेव्हा तो सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आला, तेव्हा त्याने मजेशीर अंदाजात म्हटले की, “लाओ भैय्या दो.” म्हणजेच, पुरस्कार इकडे द्या. सूर्यकुमार यादवची ही रिऍक्शन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहतेही त्याच्या रिऍक्शनला पसंती देत आहेत.

सामन्याचा आढावा
टी20 विश्वचषकाच्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स गमावत 179 धावा चोपल्या होत्या. भारताकडून मिळालेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेदरलँड्स संघाला निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 123 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना भारताने 56 धावांनी आपल्या खिशात घातला. या सामन्यात भारतासाठी 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या विजयाने भारत आपल्या गटात 4 गुणांसह अव्वलस्थानी पोहोचला आहे. तसेच, भारताचा नेट रनरेट +1.425 इतका झाला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! 19 वर्षीय चार्लीने घेतला अविश्वसनीय कॅच, पाहून तुम्हीही तोंडात घालाल बोटे
“दक्षिण आफ्रिकेकडे रबाडा अन् नॉर्किया असतील, तर आमच्याकडे विराट भाई आहे”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---