भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक खेळाडूंनी आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेतली आहे. तसेच अनेकांनी बायो बबलचा थकवा जाणवत असल्याचे कारण देत आयपीएल २०२१ स्पर्धेला टाटा बायबाय केले आहे. यात राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू लियाम लिविंगस्टोनचाही समावेश आहे. आता या खेळाडूचा बदली खेळाडू म्हणून राजस्थान रॉयल्स संघाने नवीन परदेशी खेळाडूला संधी दिली आहे. त्याचे नाव गेराल्ड कोएट्जी असे आहे.
राजस्थान रॉयल्स संघात लियाम लिविंगस्टोनच्या जागी दक्षिण आफ्रिकन संघाचा गोलंदाज गेराल्ड कोएट्जी याला संधी देण्यात आली आहे. २० वर्षीय गेराल्ड कोएट्जीने १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. १९ वर्षाखालील विश्वचषकात त्याने भारतीय संघाविरुद्ध खेळताना ३ गडी बाद केले होते.
गेराल्ड कोएट्जीची कारकीर्द
गेराल्ड कोएट्जी या २० वर्षीय दक्षिण आफ्रिकन खेळाडूने आतापर्यंत एकूण ६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने १६२ धावा आणि २४ गडी बाद केले आहेत. यात ५३ धावा देत ४ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यासोबतच त्याने आतापर्यंत एकूण ६ लिस्ट ए सामने खेळले आहेत. यात त्याला २५ धावा करण्यात यश आले आहे. तर त्याने १० गडी देखील बाद केले आहेत. तसेच टी -२० क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ८ टी-२० सामन्यात ९ गडी बाद केले आहेत. येणाऱ्या सामन्यांमध्ये हा अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्स संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो.
राजस्थान रॉयल्सच्या बऱ्याच परदेशी खेळाडूंनी घेतली माघार
राजस्थान रॉयल्स संघाला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला होता. संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यांनतर बेन स्टोक्सनेही दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. यासोबतच भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे लियान लिविंगस्टन आणि अँड्र्यू टाय यांनी देखील आयपीएलला अर्ध्यातून रामराम केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
एमएस धोनीशी तुलना केली जाणाऱ्या ‘या’ पठ्ठ्याचे झाले आयपीएल पदार्पण, जाणून घ्या त्याच्याबद्दल