ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा (4 जानेवारी) खेळ अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला. हा दिवस ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्यूशेन याने गाजवला. कधी त्याने सिगारेट पिण्याचा इशारा करत लाईटर मागितले तर कधी त्याला थर्ड अंपायरने नाबाद घोषित केले. त्याला नाबाद घोषित दिल्याने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.
दोन्ही सामने गमावल्याने दक्षिण आफ्रिकेने हार न होता तिसऱ्या सामन्यास चांगली सुरूवात केली. त्यांनी डेविड वॉर्नर (David Warner) याला 10 धावांवरच बाद केले. त्याच्यानंतर लॅब्यूशेनही 70 धावांवर असताना बाद होणार होता, मात्र पंचांनी त्याला सॉफ्ट सिग्नल दिल्याने तो नाबाद ठरला. हा प्रकार ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 40व्या षटकात घडला.
मार्को यान्सेन याने ते षटक टाकले. त्यातील पाचवा चेंडू वाईड ठरल्याने तो पुन्हा टाकला गेला. त्यावर लॅब्यूशेनने फ्लिक केले आणि तो चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या तो सिमॉन हार्मर याने झेलला. तेव्हा आफ्रिकेच्या खेळाडूंनी जल्लोष केला, मात्र मैदानी पंच पॉल रिफेल यांनी सॉफ्ट सिग्नल देत थर्ड अंपायरला फलंदाज बाद आहे की नाही हे पाहण्यास सांगितले.
थर्ड अंपायर रिचर्ड केटलबरो यांनी लॅब्यूशेनला नाबाद करार दिला. चेंडू आणि जमीन यांच्यात खूपच कमी अंतर होते, असे व्हिडिओमध्ये दिसते, मात्र हा निर्णय ऐकूण आफ्रिकेच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. तसेच या संधीचा लॅब्यूशेनला मात्र फायदा उचलता आला नाही. तो 79 धावा करत बाद झाला.
Caught at slip! Or maybe not…
Marnus Labuschagne is not out on 70 #AUSvSA pic.twitter.com/OZ6N06fRZ6
— cricket.com.au (@cricketcomau) January 4, 2023
लॅब्यूशेनची ही विकेट होती का नाही, याची चर्चा हे मार्क वॉ आणि ऍडम गिलख्रिस्ट यांनी फॉक्स क्रिकेटवर केली. वॉ म्हणाले, “व्हिडिओ पाहिला तर सांगणे कठीण आहे तो बाद की नाबाद.पुढील बाजूने पाहिले तर तो बाद वाटतो, मात्र दुसऱ्या बाजूने पाहिले तर तो नाबाद होता.”
मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत यजमान ऑस्ट्रेलिया 2-0 अशी विजयी आघाडीवर आहे. (South African players fumed at third umpire’s decision because Marnus Labuschagne was given a no-out)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुरू होण्याआधीच इंटरनॅशनल लीग टी20 ला धक्का! एक धावही होणार नाही नोंद
कधीकाळी क्रिकेटसाठी वडिलांच्या शिव्या खात मावी; द्रविडच्या ‘त्या’ शब्दांनी बदलले आयुष्य