आयपीएलनंतर जगातील सर्वात श्रीमंत टी20 लीग म्हणून चर्चा होत असलेल्या संयुक्त अरब अमिराती येथील इंटरनॅशनल लीग टी20 या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या स्पर्धेमध्ये होणाऱ्या कोणत्याही विक्रमांना व आकडेवारीला ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतला. युएई क्रिकेट बोर्ड आयसीसीचे पूर्ण सदस्य नसल्याने या स्पर्धेतील कोणतेही विक्रम खेळाडूंच्या खात्यात जमा होणार नाहीत.
आयसीसीकडून नुकतेच जाहीर करण्यात आले की, इंटरनॅशनल लीग टी20 स्पर्धेमध्ये होणाऱ्या सामन्यांना आयसीसीकडून मान्यता असलेल्या लिस्ट ए अथवा टी20 सामन्यांचा दर्जा दिला जाणार नाही. ही लीग आयसीसी नियमांची पूर्तता करत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. परंतु या स्पर्धेला आयसीसीची परवानगी आहे. आयसीसीचे पूर्ण सदस्य नसलेल्या देशांतील लीगमधील आकडेवारी ग्राह्य धरली जात नाही.
उदाहरणादाखल पाहायचे झाल्यास, या स्पर्धेत सर्वात वेगवान टी20 शतकाचा विक्रम झाला तरी तो रेकॉर्ड बुकमध्ये नोंद नसेल. दुसरीकडे, इंग्लंडमधील द हंड्रेड लीग ही टी20 क्रिकेटपेक्षा वेगळी असली तरी, पूर्ण सदस्य असलेला इंग्लंड ही स्पर्धा आयोजित करत असल्याने ती आकडेवारी टी20 क्रिकेटमध्ये ग्राह्य धरली जाते.
इंटरनॅशनल लीग टी20 चा पहिला हंगाम 13 जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार असून, अनेक दिग्गज क्रिकेटपटू यामध्ये आपले कौशल्य दाखवताना दिसतील. माजी भारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाण व रॉबिन उथप्पा हेदेखील प्रथमच विदेशातील लीग खेळताना दिसणार आहेत. याव्यतिरिक्त इंग्लंडचा जो रूटही या स्पर्धेत सहभागी होईल. या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना आयपीएलनंतर सर्वाधिक रक्कम दिली गेल्याचे बोलले जात आहे. आयपीएलमध्ये संघ मालकी असलेल्या मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्या मालकीचे संघही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.
(Performances in big-money ILT20 will NOT be recorded on players’ T20 records)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतबाबत मोठी अपडेट! स्टार विकेटकीपरवर पुढील उपचार मुंबईमध्ये होणार
INDvSL: विकेट घेण्यात हार्दिक अपयशी, मात्र नोंदवला अनोखा विक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कॅप्टन