शनिवारी दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरीयनच्या मैदानावर श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनी हाताच्या मुठी उंचावत वर्णभेदाविरोधात आपला निषेध नोंदवला. जगभरात चालू असलेल्या ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ या चळवळीला हा एक प्रकारे दिलेला पाठिंबा मानला जात आहे. परंतु या चळवळीत सहसा गुडघ्यावर बसून निषेध नोंदविण्याचे प्रतीक प्रचलित आहे, ते करण्यास आफ्रिकन संघ उत्सुक दिसला नाही.
क्विंटन डी कॉकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकन संघाने राष्ट्रगीत झाल्यावर हाताच्या मुठी उंचावल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघावर जगभरातून ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी दबाव निर्माण होत होता. मात्र खेळाडूंनी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात आफ्रिकेत हाताच्या मुठी उंचावून देखील वर्णभेदाचा निषेध करण्याची परंपरा असल्याचे नमूद करण्यात आले.
आफ्रिकन खेळाडूंनी याबबत विस्तृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी म्हंटले आहे कि “आमच्या इतिहासात हाताच्या मुठी उंचावत निषेध नोंदवणे, हे एक महत्वाचे प्रतीक आहे. हे प्रतीक नेल्सन मंडेला यांची १९९० साली तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काढण्यात आलेल्या त्यांच्या आणि विनी मंडेलांच्या फोटोत देखील दिसून येते. हे प्रतीक वर्णभेदाच्या निषेधाचे होते तसेच न्याय, समता आणि स्वातंत्र्य यासाठी संघर्ष करण्याचेही होते. त्यामुळे आम्ही हे प्रतीक दर्शविले असून आमच्या संघातील खेळाडू प्रत्येकाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांचा आदर करतात.”
PROTEAS FULL STATEMENT
"The raised fist is a powerful gesture in our own history, as expressed in the iconic images of Nelson and Winnie Mandela on Mandela’s release from prison in 1990."
Read the Full Statement here https://t.co/bOLxfEAEBU#BlackLivesMatter pic.twitter.com/x82MFfIzis
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 26, 2020
या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास पहिल्या दिवशी श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ८० षटकात त्यांच्या ६ बाद ३३२ अशा धावा झाल्या आहेत. श्रीलंकेकडून दिनेश चंडीमलने ८५ धावांची तर धनंजय डी सिल्वाने ७९ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून विआन मुल्डरने सर्वाधिक ३ बळी घेतले.
महत्वाच्या बातम्या:
– बॉक्सिंग डे कसोटी : पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या ३ बाद २२२ धावा, केन विलियम्सन शतकाच्या जवळ
– IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात
– पहिल्या दिवसाच्या कामगिरीनंतर दिग्गज भारतीय संघावर खुश, ट्विट करत केले कौतुक