भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA)यांच्यात मालिकेतील तिसरा वनडे सामना मंगळवारी (11 ऑक्टोबर) दिल्ली येथे खेळला गेला. अरूण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय गोलंदाजांनी मालिका निर्णयाक सामन्यात जबरदस्त गोलंदाज केली आहे. यामुळे पाहुणा संघ 27.1 षटकात 99 धावांवरच गारद झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ वनडे इतिहासात चौथ्यांदा 100च्या आत धावसंख्येवर सर्वबाद झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्यांदा भारताविरुद्धच्या या मालिकेत कर्णधार बदलला आहे. या सामन्यात डेविड मिलर याने वनडे कर्णधार म्हणून पदार्पण केले. त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध प्रथमच वनडेमध्ये 100च्या आत सर्वबाद झाली आहे. याआधी भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिका नैरोबीमध्ये 117 वर सर्वबाद झाली होती. हा सामना 1999मध्ये खेळला गेला, ज्याला आता 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेने वनडेमध्ये तिसऱ्यांदा भारताविरुद्ध कमी धावसंख्या केली आहे. 2018मध्ये सेंच्युरीयन येथे झालेल्या सामन्यात यजमान संघ 118 धावांवर ऑलआऊट झाला होता.
दक्षिण आफ्रिकेने वनडेमध्ये सर्वात कमी धावसंख्या 1993मध्ये केली होती. सिडनीमध्ये झालेल्या त्या सामन्यात आफ्रिकन संघ 69 धावसंख्येवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर 2008मध्ये इंग्लंड विरुद्ध नॉटींघममध्ये 83 धावसंख्या उभारली होती. त्याचबरोबर यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा संघ एवढ्याच धावसंख्येवर सर्वबाद झाला होता. आता संघ चौथ्यांदा 100पेक्षा कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनीच दहाचा आकडा पार केला, तर 8 फलंदाज एकरी धावा करतच बाद झाले आहेत. यावेळी फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने भन्नाट गोलंदाजी केली. त्याने 4.1 षटकात 18 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. ही त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. हा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकत मालिका 2-1 अशी नावावर केली आहे.
वनडे सामन्यात भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेची सर्वात कमी धावसंख्या:
2022 मध्ये, दिल्ली – 99
1999 मध्ये, नैरोबी – 117
2018 मध्ये, सेंच्युरियन – 118
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराज-सुंदरनंतर कुलदीप शो! यादवसाठी दुसऱ्या क्रमांकाचा ‘वनडे स्पेशल’ संघ दक्षिण आफ्रिका, पहिल्या…
कार्तिकनंतर ‘हा’ असणार टीम इंडियाचा फिनिशर? संघ व्यवस्थापनाने आताच दिली जबाबदारी
कॅप्टन रोहितचा संघ टी20 वर्ल्डकपनंतर ‘या’ संघाच्या दौऱ्यावर जाणार, पाहा संपूर्ण स्केड्युल