वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2025) दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर झाला आहे. फायनलसाठी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने असतील. या फायनल सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. WTC फायनल सामना (11 ते 15 जून) दरम्यान इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. याच वेळी डोपिंगमुळे नुकताच एक महिन्याच्या बंदीला सामोरे गेलेला कागिसो रबाडा (Kagiso Rabada) संघात परतणार आहे. तर आफ्रिका संघ टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल.
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीत दुखापतीतून परतलेला लुंगी एनगिडी देखील आहे. मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश आणि विआन मुल्डर हे वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाचे नेतृत्व करताना दिसतील. मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांचा असा विश्वास आहे की त्यांचा संघ WTC फायनल सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे, त्यात कोणतीही कमतरता नाही.
2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत, दक्षिण आफ्रिकेने एकूण 12 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 8 विजय नोंदवल्यानंतर 69.44 गुणांची टक्केवारी गाठली.
WTC फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, लुंगी एनगिडी, टोनी डी जियोर्गी, डेव्हिड बेडिंगहॅम, केशव महाराज, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, सेनुरन मुथुसामी, मार्को जॅन्सेन, कागिसो रबाडा, काइल व्हेरेन, डेन पीटरसन, वियान मुल्डर, रायन रिकेलटन






टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा