कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात शुक्रवारी (2 डिसेंबर) दोन अतिशय महत्त्वाचे सामने खेळले गेले. एच गटातील या दोन्ही सामन्यातील निकालांनी उपउपांत्यपूर्व फेरीचे चित्र स्पष्ट झाले. दक्षिण कोरियाने पोर्तुगालचा पराभव करत पुढील फेरीत जागा मिळवली. तर, विजय मिळवूनही उरूग्वे संघाला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.
Huge win for #KOR, but they must now wait for #GHA v #URU to finish… ⌛️@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 2, 2022
या सामन्यात दक्षिण कोरिया संघाला कोणत्याही स्थितीत विजय आवश्यक होता. ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने पहिला गोल नोंदवत आघाडी घेतली. त्यानंतर कोरियाने गोल करत पहिल्या हाफमध्ये 1-1 अशी आघाडी मिळवली. पुढील फेरी जाण्यासाठी कोरियाला कमीत कमी एक गोल करणे आवश्यक होते. पूर्ण वेळेत सामना बरोबरीत राहिल्यानंतर व्यतिरिक्त वेळेत हॉंग ही चॅनने गोल करत कोरियाला पुढील फेरीच्या जवळ नेले. त्यांनी पुढील सहा मिनिटात गोल न होऊ देतात विजय साजरा केला.
त्याचवेळी या गटातील दुसऱ्या सामन्यातही जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. घाना विरूद्ध उरूग्वे यांच्यातील या सामन्यात उरूग्वेने 2-0 असा विजय संपादन केला. मात्र, तरीदेखील त्यांना पुढील फेरीचे तिकीट मिळू शकले नाही. या गटात कोरिया व उरूग्वे यांनी प्रत्येकी एक बरोबरी व एक विजय नोंदवला. दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण मिळाले असले तरी, कोरिया संघाने साखळी फेरीत एकूण चार गोल मारत पुढील फेरीत जागा बनवली. दुसरीकडे उरूग्वे केवळ दोन गोल करण्यात यशस्वी ठरला.
(South Korea Beat Portugal In FIFA WORLD CUP Entered In Pre Quarter Finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्युती चंद अडकली विवाहबंधनात! आपल्या समलैंगिक साथीदाराशी बांधली सात जन्माची गाठ
भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची दुकानदाराला मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल