मागील काही काळापासून सिनेसृष्टीत दिग्गज खेळाडूंवर चित्रपट बनवले जात आहे. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्यापासून मेरी कोम या जगभरात नाव कमावलेल्या भारतीय खेळाडूंवर बनवलेले चित्रपटांनी करोडोंची कमाई केली. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन व एमएस यांच्या जीवनावर आधारित देखील चित्रपट येऊन गेले आहेत. त्याचवेळी आता एका प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्याने थेट भारताचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्या आयुष्यावरील चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
सध्या आरआरआर हा प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट ऑस्कर पुरस्कारात नाटू-नाटू गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाल्याने चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनय केलेला अभिनेता रामचरण नुकताच भारतात परतला. त्यावेळी त्याने भविष्यात खेळावर आधारित चित्रपटात अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“मी खेळांचा खूप मोठा चाहता आहे. मागील काही काळापासून मी खेळांवर आधारित चित्रपटात अभिनय करण्याचा विचार करतोय.”
त्याचवेळी त्याला विराट कोहली यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करायला आवडेल का? असे विचारण्यात त्यावर त्याने उत्तर दिले,
“नक्कीच, विराट एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. मला स्वतःला त्याचा खेळ अत्यंत आवडतो. संधी मिळाल्यास मी त्याच्या बायोपिकमध्ये भूमिका निभावेल. तसेही आम्ही दोघे थोडेफार एकसारखे दिसतो.”
सध्या विराट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेत खेळताना दिसतोय. मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना विराट नाटू-नाटू गाण्यावर ताल धरताना पाहायला मिळाला होता.
(South Superstar Ramcharan Wishing Play Lead In Virat Kohli Biopic)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीसंतच वेगळंच असतं! आयपीएलसाठी पाठिंबा एका संघाला आणि जिंकण्याची प्रार्थना दुसऱ्या संघासाठी
महिला आरसीबीच्या सुमार खेळीसाठी विराट, डिविलियर्स आणि ‘हा’ दिग्गज जबाबदार? माजी गोलंदाजाचे मोठे विधान