---Advertisement---

वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची फायनल होणार साउदम्प्टनच्या मैदानावर? ‘या’ कारणामुळे लॉर्डस गमावणार यजमानपद

On: रविवार, मार्च 7, 2021 3:13 PM
---Advertisement---

भारतीय संघाने काल इंग्लंडला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे १८ जूनपासून खेळवल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ विजेतेपदासाठी झुंजतील. मात्र आता या अंतिम फेरीच्या आयोजनाच्या स्थळात बदल होणार असल्याचे वृत्त आहे. अंतिम फेरी लॉर्डसच्या मैदानावर न खेळवता अन्यत्र हलवली जाणार आहे.

तसेच लॉर्डस व्यतिरिक्त विचार केल्या जाणाऱ्या आयोजन स्थळांमध्ये साउदम्प्टनचे मैदान सगळ्यात आघाडीवर असल्याचेही म्हंटले जात आहे. एका आघाडीच्या क्रीडा संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार आयसीसी तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्ड या दोन्ही संस्थांची प्रथम पसंती साउदम्प्टनलाच आहे.

बायो बबलमुळे होणार बदल 

आयोजनस्थळातील हा बदल कोरोना विषाणूच्या नियमांमुळे होत असल्याचे समजते. कोरोना विषाणूच्या परिस्थितीमुळे सामन्यादरम्यान, आणि सामन्याआधी देखील खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला बायो बबलमध्ये राहणे अनिवार्य झाले आहे. याच विचार केला असता लॉर्डसचे मैदान बायो बबलमध्ये खेळण्यासाठी फारसे सोयीस्कर नाहिये. म्हणूनच आयोजन स्थळात बदल करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

अशा परिस्थितीत हॅम्पशायर कौंटीचे गृहमैदान असलेल्या साउदम्प्टनच्या एजेस बाऊल मैदानाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे यजमानपद मिळू शकते. मागील वर्षी देखील इंग्लंडचे पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे सामने या मैदाने यशस्वीपणे आयोजित केले होते. या मैदानाच्या लागतच फाइव्ह स्टार हॉटेल उपलब्ध असल्याने बायो बबलमध्ये राहणाऱ्या खेळाडूंसाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. त्यामुळे यजमानपदाच्या शर्यतीत हेच मैदान पुढे असल्याचे म्हंटले जात आहे.

दरम्यान, या व्यतिरिक्त मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डचे मैदान आणि बर्मिंगहॅम येथील एजबस्टनचे मैदान देखील या शर्यतीत आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी या सगळ्या स्टेडियमच्या क्षमतांचा आढावा घेत आहेत. मात्र लॉर्डसचे यजमानपद अन्यत्र हलवण्यात येत असल्याबाबत अजून कुठलीही अधिकृत घोषणा झाली नाहिये.
महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---