टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक संघांच्या नावावर मोठे रेकाॅर्ड्स आहेत जे अद्याप कोणीही तोडू शकलं नाही. तत्पूर्वी स्पेनच्या संघानं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. युरोप टी20 विश्वचषक उप-पात्रता सी, मध्ये ग्रीसवर 7 विकेट्सनं विजय मिळवून स्पेननं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 14वा विजय मिळवला.
स्पेनचा संघ आता पुरुषांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनला आहे. स्पेननं मलेशियाचा रेकाॅर्ड मोडला आहे, मलेशियानं सलग 13 विजयांचा रेकाॅर्ड केला होता. पण आता स्पेननं हा रेकाॅर्ड मोडीत काढून इतिहास रचला. सर्व टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग सामने जिंकण्याचं रेकाॅर्ड थायलंडच्या महिला संघानं बनवलं आहे. त्यांनी सलग 17 सामने जिंकले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये स्पेनचा पराभव सुमारे 20 महिन्यांपूर्वी इटलीविरुद्ध झाला होता, त्यानंतर त्यांनी आयल ऑफ मॅन, जर्सी आणि क्रोएशिया यांच्याविरुद्ध मालिकेत 14 विजय मिळवले आहेत, तसेच मागील वर्षी झालेल्या सामन्यात देखील सलग 3 विजय मिळवले होते.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
स्पेन -14
मलेशिया- 13
बर्म्युडा- 13
अफगाणिस्तान- 12
रोमानिया- 12
भारत- 12
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कर्णधार रोहितने कसली कंबर, सुरू केली खास ट्रेनिंग
बीसीसीआयमध्ये जय शहांची जागा घेणार ‘हे’ दिग्गज? सचिवपदाच्या शर्यतीत नाव सर्वात आघाडीवर
“संघात मोठे बदल करणार…” लाजिरवाण्या पराभवानंतर पीसीबी प्रमुखाचं मोठं वक्तव्य