ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे खेळल्या गेलेल्या फिफा महिला फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (20 ऑगस्ट) सिडनी येथे खेळला गेला. या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा 1-0 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पेनची कर्णधार ओल्गा कार्मोना हिने झळकावलेला गोल निर्णायक ठरला. विश्वविजेती कर्णधार म्हणून विश्वचषक उंचावल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तिच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याचे वृत्त तिला समजले.
सिडनी येथे झालेल्या या अंतिम सामन्यात स्पेनला पराभूत करत प्रथमच महिला विश्वचषक जिंकला. कर्णधार ओल्गा कार्मोना हिने 29 व्या मिनिटाला केलेला गोल अखेरीस महत्त्वाचा ठरला. स्पेन संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर ओल्गा हिला एक दुःखद बातमी समजली.
Y sin saberlo tenía mi Estrella antes de que empezase el partido. Sé que me has dado la fuerza para conseguir algo único. Sé que me has estado viendo esta noche y que estás orgulloso de mí. Descansa en paz, papá 🌟❤️🩹 pic.twitter.com/Uby0mteZQ3
— Olga Carmona (@7olgacarmona) August 20, 2023
ओल्गा कार्मोना हिने आपल्या संघासह विजयाचा जल्लोष केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी वडिलांचे निधन झाल्याची बातमी तिला सांगितली. विशेष म्हणजे सामना सुरू असतानाच त्यांचे निधन झाले होते. ओल्गाचे वडील मागील काही काळापासून आजारी होते. त्यांच्या कुटुंबातील काही लोक विश्वचषक पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आलेले.
वडिलांच्या निधनानंतर तिने एक सोशल मीडिया पोस्ट करत तुम्ही मला नेहमीच प्रेरणा दिली, असे म्हटले. स्पेन फुटबॉल महासंघ व फिफा यांनी देखील तिच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली.
स्पेन महिला विश्वचषक जिंकणारा केवळ पाचवा देश ठरला आहे. आतापर्यंत अमेरिकेने चार वेळा, जर्मनीने दोन वेळा तर नॉर्वे व जपानी एकदा विश्वचषक जिंकला होता.
(Spain’s World Cup hero Olga Carmona has paid tribute to her father after finding out he passed away following the final)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकात सुरवातीच्या सामन्यांना मुकणार केएल राहुल, आगरकरांनी दिली ‘मोठी’ माहिती
शिखर धवनची भविष्यवाणी! विश्वचषकात ‘हे’ पाच खेळाडू करणार धमाका, यादीत दोन भारतीय