भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आज (14 डिसेंबर) त्याचा 24वा वाढदिवस साजरा करत आहे. मार्च 2017ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने भारतीय संघामध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने 68 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
आतापर्यत कुलदिपने 5 कसोटी सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत. मर्यादीत षटकामध्ये त्याची गोलंदाजी उत्तम असून त्याने 33 वन-डे सामन्यात 67 विकेट्स आणि 17 टी20 सामन्यात 33 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताच्या या चायनामन गोलंदाजाबद्दल काही खास गोष्टी:
-कुलदीप यादवचा जन्म 14 डिसेंबर, 1994ला उन्नाव, उत्तर प्रदेशमध्ये झाला.
-2014च्या 19 वर्षाखालील आयसीसी विश्वचषकात त्याचा भारतीय संघात समावेश होता. यामध्ये त्याने स्कॉटलंड विरुद्ध हॅट्ट्रीकही घेतली आहे.
-2014च्या 19 वर्षाखालील आयसीसी विश्वचषकात 14 विकेट्स घेत तो सर्वाधिक विकेट्स घेण्याऱ्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता.
-2012च्या 19 वर्षाखालील भारतीय संघात प्रवेश करण्याची त्याची संधी थोडक्यात मुकली. हा विश्वचषक भारताने उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.
-29 प्रथम श्रेणीचे सामने खेळताना कुलदिपने 24.88च्या सरासरीने 846 धावा केल्या असून यामध्ये त्याच्या एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेशही आहे. त्याने 3.66च्या इकॉनॉमी रेटने 112 विकेट्स घेतल्या आहेत.
– 2014च्या 19 वर्षाखालील आयसीसी विश्वचषकातील त्याची कामगिरी बघता भारतीय वरिष्ठ संघात त्याची विंडीज विरुद्धच्या सामन्यासाठी निवड झाली होती. मात्र विंडीजच्या खेळाडूंनी त्यांच्या बोर्डशी असलेल्या वादामुळे तो दौरा रद्द केला.
-2012च्या आयपीएलमध्ये कुलदिप मुंबई इंडियन्सच्या संघात होता. पण तो एकही सामना खेळला नाही. यावेळी तो सचिन तेंडुलकरला नेटमध्ये चेंडू टाकत असे.
-कोलकाता नाईट रायडर्सने कुलदिपला 2014च्या हंगामात संघामध्ये घेतले. पण त्याला चॅम्पियन्स लीगपर्यत वाट पाहावी लागली. यावेळी त्याने 5 सामन्यात 6 विकेट्स घेत संघाला अंतिम फेरीपर्यत पोहचण्यास मदत केली होती.
-कुलदिपने कानपूर येथे क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याने वेगवान गोलंदाज म्हणून सुरूवात केली होती. नंतर प्रशिक्षक कपिल पांडेनी त्याला फिरकी गोलंदाजी करण्यास सांगितले.
-2017च्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. त्याच्या जागी कुलदिपला संधी देण्यात आली होती. याचा फायदा घेत त्याने पहिल्याच सामन्यात 68 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी डेव्हीड वॉर्नर हा त्याचा पहिला शिकार ठरला.
महत्त्वाच्या बातम्या:
–१९९० नंतर टीम इंडियाच्या बाबतीत केवळ चौथ्यांदाच घडले असे काही…
–विराट कोहलीचे टेन्शन वाढले, चांगली कामगिरी केली नाही तर…
–आयपीएल २०१९चा लिलाव कधी आणि कोणत्या चॅनेलवर पहाल?