बेन स्टोक्स हे नाव ऐकलं, तरी चाहत्यांच्या मनात विजयाच्या आशा उमलतात. आपला संघ कितीही अडचणीत आसला, तरी बेन स्टोक्स त्यातून संघाला बाहेर काडेल, असा विश्वास चाहत्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळतो. 2019 वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना असो किंवा 2022 टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना, स्टोक्स नेहमीच संघासाठी मॅच विनर ठरला. ऍशेस 2019 मधील तिसऱ्या कसोटीत त्याची खेळी तर आजही अंगावर काटा आणते. आज स्टोक्स आपल्या वयाची 32 वर्ष पूर्ण करत आहेत. चाहत्यांकडून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
आयसीसी वनडे विश्वचषक 2019 चा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात बेन स्टोक्स (Ben Stokes) याने न्यूझीलंडसाठी नाबाद 84 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही त्याने फलंदाजी केली, पण सामना बरोबरीत सुटला होता. या सामन्याते विजेतेपद चौकारांच्या आधारे इंग्लंडला दिले गेले होते. त्यानंतर ऍशेस 2019 मध्ये स्टोक्स पुन्हा एकदा चमकला. त्याने मालिकेतील तिसऱ्या सामन्यात एकट्याच्या जोरावर इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. विजयासाठी ऑस्ट्रेलियाकडून 359 धावांचे लक्ष्य मिळाले होते. इंग्लंडने 286 धावांवर 9 विकेट्स गमावल्या होत्या. बेन स्टोक्स आणि जॅक लीचसोबत शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडने हातात एक विकेट शिल्लक ठेऊन विजय मिळवला.
मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात देखील स्टोक्सच्या जोरावर इंग्लंडने विजेतेपद पटकावले. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्टोक्सने 52 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि आपल्या संघाला सामना जिंकवून दिला. 4 जून 1991 रोजी जन्मलेल्या बेन स्टोक्सला मागचे महत्व मागच्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. 2017 साली आपल्या निकटवर्तीयांसोबत वाद घातल्यानंतर स्टोक्सवर तुरुंगात जाण्याची वेळही आली होती. मात्र, यामुळे त्याचे क्रिकेटमधील महत्व कधीच कमी झाले नाही. आयपीएल 2018 मध्ये लगेच राजस्थान रॉयल्सने त्याला 12.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्यावेळी स्टोक्स आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
आयपीएल 2023 मध्येही स्टोक्सला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 16.25 कोटी रुपये खर्च केले. असे असले तरी, त्याने यावर्षीच्या आयपीएल हंगामात फक्त दोन सामने खेळले. लीग स्टेजनंतर स्टोक्स मायदेशी परतला आणि संघासाठी जास्त काही न करताही आयपीएलचा विजेता बनला. (Special article for Ben Stokes on his 32nd birthday)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बेन स्टोक्सने रचला इतिहास! बनला 146 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच कॅप्टन
WTC फायनलमध्ये जडेजा-अश्विन जोडीने खेळावे की नाही? माजी निवडकर्ता म्हणाला, ‘दोघांना दुर्लक्षित…’






