सोमवारी (२९ मार्च) आयपीएल २०२२ मध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या नव्याने आयपीएलमध्ये उतरलेल्या फ्रँचायझी या सामन्यात आमने सामने होत्या. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या थरारक सामन्याचा निकाल शेवटच्या षटकात लागला. गुजरातकडून नवख्या पदार्पणवीराने शेवटच्या षटकात सलग २ चौकार खेचत संघाला ५ विकेट्सने सामना जिंकून दिला. गुजरातसाठी ही मॅच विनिंग कामगिरी करणारा खेळाडू अजून कोण नसून २७ वर्षीय अभिनव मनोहर आहे.
शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या सामन्यात लखनऊच्या १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून राहुल तेवतिया आणि डेविड मिलरने बहुमूल्य भागीदारी रचली. मात्र अननुभवी अभिनवने (Abhinav Manohar) निर्णायक अशा विसाव्या षटकात आतिशी फलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले.
गुजरातला विसाव्या षटकात विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. अशावेळी अभिनवने पहिल्या २ चेंडूंवर सलग २ चौकार ठोकत ८ धावा जोडल्या. त्यानंतर तेवतियाने चौकार मारत सामन्याचा विजयी शेवट केला. अभिनवने या संपूर्ण सामन्यात ७ चेंडूंमध्ये ३ चौकारांच्या मदतीने नाबाद १५ धावा फटकावल्या. विशेष म्हणजे, हा त्याचा पदार्पणाचा आयपीएल सामना होता. त्याच्या या मोलाच्या योगदानानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने त्याचे कौतुक करताना त्याला भविष्यातील अद्भुत खेळाडू म्हटले आहे.
मात्र पहिल्याच आयपीएल सामन्यात इतकी वाहवाह लुटणारा अभिनव मनोहर आहे तरी कोण? त्याची यापूर्वीची क्रिकेटमधील आकडेवारी कशी राहिलीय? (Abhinav Manohar Information) याबद्दल जाणून घेऊ…
https://www.instagram.com/p/CbSRhTdFHFc/?utm_source=ig_web_copy_link
कोण आहे अभिनव मनोहर?
अभिनव देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करतो. २७ वर्षीय अभिनव फलंदाजीबरोबर लेग ब्रेक गोलंदाजी करण्यातही वाकबगार आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१-२२ मधील आपल्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले होते. त्याला कर्नाटकनकडून बादफेरी सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करत त्याने उपउपांत्यपूर्व सामन्यात ४९ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावा केल्या होत्या. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात ९ चेंडूंमध्ये १९ तर उपांत्य सामन्यात १३ चेंडूत २७ व अंतिम सामन्यात ३७ चेंडूत ४६ धावा केल्या होत्या.
https://www.instagram.com/p/CbrsYhBspjj/?utm_source=ig_web_copy_link
लिलावात १३ पटींपेक्षा जास्त किंमतीला गुजरातने घेतले विकत
देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शन पाहता गुजरातला या खेळाडूला विकत घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागली. आयपीएल २०२२ साठी त्याने राजस्थान रॉयल्सकडून ट्रायल दिले होते. मेगा लिलावात तो २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह उतरला होता. त्याला विकत घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रस्सीखेच झाली होती. अखेर गुजरातने मूळ किंमतीच्या १३ पटीने जास्त म्हणजे २ कोटी ६० लाखांना त्याला विकत घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022 । कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याने जिंकला पहिलाच सामना, ‘या’ खेळाडूला दिले विजयाचे श्रेय
आता कसं करू? ‘मोठ्या’नेच घेतली ‘छोट्या’ची विकेट, हार्दिकच्या विकेटवर असा रिऍक्ट झाला कृणाल