सलामीच्या लढतीत दारुण पराभव झालेल्या भारतीय संघाने दुसऱ्या टी२० सामन्यात ७ गडी राखून दमदार पुनरागमन केले. यासह भारताने मालिकेत १-१ ने बरोबरीही साधली. भारत विरुद्ध इंग्लंड या उभय संघात अहमदाबाद येथे झालेला हा सामना भारताचा कर्णधार विराट कोहली याने गाजवला. खराब फॉर्मवर मात करत त्याने झुंजार अर्धशतक ठोकले. यानंतर आपल्या चांगल्या फॉर्ममध्ये परतण्याचे श्रेय विराटने त्याचा जवळचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स याला दिले आहे.
दुसरा टी२० सामना संपल्यानंतर विराटने सांगितले की, “मला माझ्या बारीकसारीक चुका सुधारण्यासाठी पुन्हा बेसिक्सवर काम करावे लागले. मी इतर गोष्टींचा उगाचच खूप जास्त विचार करत होते. सामन्यापुर्वी संघ प्रशिक्षकांनी माझ्या फलंदाजीसंदर्भात छोटछोट्या गोष्टींबद्दल माझ्याशी चर्चा केली होती. अनुष्काही इथेच आहे तिनेही मला बऱ्याच गोष्टी समजावल्या होत्या.”
“महत्त्वाचे म्हणजे, या सामन्याआधी मी डिविलियर्सला फोन केला होता. फोनवर आम्ही विशेष चर्चा केली आणि त्याने मला फक्त चेंडूला पाहून खेळायला सांगितले. त्याच्या सल्ल्यानुसार या सामन्यात फलंदाजी करतेवेळी माझे लक्ष पूर्णपणे समोरुन येत्या चेंडूकडे होते. मला नेहमी माझ्या संघासाठी चांगल्या गोष्टी केल्याचा अभिमान वाटतो. इंग्लंडविरुद्ध ७० च्या जवळपास धावा करुन मी खूप आनंदी आहे,” असे पुढे विराटने सांगितले.
https://twitter.com/CricFreakYash/status/1371152690940547075?s=20
विराट कोहलीने एकहाती जिंकून दिला सामना
दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारताला १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात कर्णधार विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद ७३ धावांची अफलातून खेळी केली. ४९ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि ५ चौकार मारत त्याने ही धावसंख्या उभारली. याबरोबरच शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत संघाला अविस्मरणीय विजय दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
अर्धशतकासह टी२० क्रिकेटमधील ‘मोठ्या’ विक्रमात विराटची भरारी, रोहितला पछाडत अव्वलस्थानी विराजमान
Video: पंतने मारला ९० मीटरचा खणखणीत षटकार; कोहलीने अलिंगन देतच केलं कौतूक
‘हीच’ होणार जसप्रीत बुमराहची वधूराणी, बॉलिवूड अभिनेत्रीने केला शिक्कामोर्तब