भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women Cricket Team) त्यांच्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ (ICC Women ODI World Cup 2022) मोहिमेची सुरुवात विजयासह केली आहे. त्यांनी कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तान संघाला (IND vs PAK) पहिल्याच सामन्यात १०७ धावांच्या अंतराने पराभूत केले आहे. मात्र भारतीय संघासाठी हा विजय सोपा नव्हता. कारण भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज सपशेल फ्लॉप ठरल्या होत्या. परंतु स्नेह राणा (Sneh Rana) आणि पूजा वस्त्राकार यांनी खालच्या फळीत फलंदाजीला येत संघाची डगमगती गाडी रूळावर आणली आणि सामनाही जिंकून दिला.
पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात संकटमोचक ठरलेली स्नेह राणा हिची क्रिकेट कारकिर्द (Sneh Rana Life Story) सोपी राहिलेली नाही. तिला बऱ्याच चढ-उतरांचा सामना केल्यानंतर प्रसिद्धी मिळाली आहे.
पदार्पणानंतर लगेचच सुरू झाला संघर्ष
२८ वर्षीय गोलंदाजी अष्टपैलू स्नेह राणा आज भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. मात्र उत्तराखंडच्या देहरादूनमधून आलेली स्नेह राणा हिची कारकिर्द आणि आयुष्य चढ-उतारांनी भरलेली राहिली आहे. तिने २०१४ साली भारताकडून वनडेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु २०१६ नंतर तिला दुखापत झाल्यामुळे तिला संघाबाहेर करण्यात आले होते. भारतीय संघातून बाहेर होण्यापूर्वी राणाने केवळ ७ सामने खेळले होते. परंतु तिने धैर्य राखले आणि आपल्या मेहनत व दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात जोरदार पुनरागमन केले.
कसोटी संघातील निवडीपूर्वी गमावले होते वडिलांना
राणाला जून २०२१ मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वनडे संघात निवडले गेले होते. या दौऱ्यावरच १६ जून २०२१ रोजी ब्रिस्टलमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी तिची भारतीय संघाच्या अंतिम एकादशमध्ये निवड झाली होती. या सामन्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय संघाची जर्सी घातल्यानंतर तिने तिच्या दिवंगत वडिलांची आठवण (Shen Rana Lost Her Father) काढत लिहिले होते की, ‘कदाचित. तुम्ही मला भारतीय कसोटी संघाच्या जर्सीत पाहण्यासाठी आणि या क्षणाला जगण्यासाठी इथे असता.’
https://www.instagram.com/p/CQVrfq7B9wE/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CULzmL9PpUj/?utm_source=ig_web_copy_link
दुर्दैवाची बाब अशी की, इंग्लंड दौऱ्यासाठी स्नेह राणाची निवड होण्याच्या २ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे कसोटी पदार्पणावेळी ती वडिलांच्या आठवणीत भावुक होऊन म्हणाली होती की, भारतासाठी कसोटी पदार्पण करणे माझ्यासाठी भावनिक क्षण होता. कारण तिचे वडिल तिला भारताकडून पुन्हा खेळताना पाहू इच्छित होते.
https://www.instagram.com/p/CPfTofyhW3z/?utm_source=ig_web_copy_link
इंग्लंडमध्ये रचला होता इतिहास
स्नेह राणाने राष्ट्रीय संघात पुनरागमन करत आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अष्टपैलू प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधले होते. तिने या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ८० धावांनी नाबाद खेळी करत तो सामना अनिर्णीत राखण्यात योगदान दिले होते. त्यावेळी तिने तानिया भाटियासोबत मिळून नवव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारीही रचली होती. याव्यतिरिक्त तिने पहिल्या डावात ४ विकेट्सही घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत तर तुलना होतेच, पण आता पाकिस्तानच्या आझमची गोलंदाजीतही विराटची कॉपी, पाहा व्हिडिओ
‘मी त्याला का अडवू? माझी वेळ गेली आहे’, अश्विनने विक्रम मोडल्यानंतर कपिल देवची प्रतिक्रिया






