माउंट मौनगानुई| न्यूझीलंड येथे होत असलेल्या महिला विश्वषचक २०२२ स्पर्धेत रविवारी (६ मार्च) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाची मधली फळी कोलमडल्यानंतर स्नेह राणा आणि पुजा वस्त्राकर यांनी शतकी भागीदारी रचली. याबरोबरच त्यांनी मोठा विक्रम केला आहे.
स्नेह राणा-पुजा वस्त्राकर यांची शतकी भागीदारी
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सलामीला फलंदाजीला आलेली शेफाली वर्मा शुन्यावरच बाद झाली. पण त्यानंतर स्म्रीती मंधना आणि दिप्ती शर्मा यांनी भारताचा डाव सावरत ९२ धावांची भागीदारी रचली. मात्र दिप्ती ४० धावा करून २२ व्या आणि स्म्रीती ५२ धावांची अर्धशतकी खेळी करून २५ व्या षटकात बाद झाली. त्यानंतर भारताची मधली फळी कोलमडली. भारताने ११६ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या.
पण, यापुढे स्नेह राणा आणि पुजा वस्त्राकर यांनी आक्रमक खेळ करत सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी (century partnership for 7th wicket) रचली आणि भारताला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. या दोघींनी वैयक्तिक अर्धशतके करताना १२२ धावांची मोठी भागीदारी रचली.
शतकी भागीदारीने तोडले मोठे विक्रम
स्नेह राणा आणि पुजा वस्त्राकर (Sneh Rana and Pooja Vastrakar) यांची पहिलीच जोडी ठरली आहे, ज्यांनी महिला विश्वचषकाच्या ( Women’s World Cup) सामन्यात ७ व्या किंवा त्याखालच्या क्रमांकासाठी शतकी भागीदारी केली केली आहे.
इतकंच नाही, तर महिला वनडे क्रिकेटमध्ये (Women’s ODIs) ७ व्या किंवा त्याखालच्या क्रमांकासाठी केलेली ही तिसरीच शतकी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या निकोला ब्राऊन-साराह त्सुकीगावा आणि इंग्लंडच्या नताली सायव्हर-डॅनिएल हेजल या जोडीने असा कारनामा केला होता. तसेच स्नेह राणा आणि पुजा वस्त्राकर यांची १२२ धावांची भागीदारी ही महिला वनडेत सातव्या विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागादारीही ठरली आहे.
तसेच स्नेह राणा आणि पुजा वस्त्राकर यांची महिला वनडे सामन्यात ७ व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर सर्वोच्च धावांची भागीदारी करणारी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम हरमनप्रीत कौर आणि झुलन गोस्वामी या जोडीच्या नावावर होता. त्यांनी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ७७ धावांची भागीदारी केली होती. तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर शेफाली वर्मा आणि पुजा वस्त्राकर यांची जोडी आहे. त्यांनी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७६ धावांची भागीदारी केली होती.
रविवारी भारतीय संघाकडून मंधना व्यतिरिक्त पुजा वस्त्राकरने ६७ धावांची, तर स्नेह राणाने नाबाद ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २४४ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेन वॉर्नचे ‘ते’ तीन सामने, ज्यांनी त्याला बनवले ‘फिरकीचा जादूगार’
जडेजा-अश्विनच्या भविष्याबाबत भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “आता या दोघांना…”
गतविजेत्या मुंबई सिटीचे आव्हान संपुष्टात, हैदराबादच्या विजयाने केरला ब्लास्टर्स उपांत्य फेरीत