आयपीएल या टी२० लीगमुळे खेळाडूंचे आयुष्यच बदलले नाही तर त्यांना जगभरात नवी ओळख मिळाली आहे. आयपीएलमध्ये येत गरीब परिस्थितीतून बऱ्याचशा खेळाडूंनी त्यांच्या घरच्यांना श्रीमंती दाखवली. यामध्ये टी नटराजन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि मोहम्मद सिराज अशी काही नावे सांगता येतील. आयपीएलद्वारे मोठे मोठे खेळाडू घडवले गेले. त्यातलाच एक म्हणजे रिंकू सिंग.
रिंकू सिंगवर एवढी बिकट परिस्थिती काही काळापूर्वी आली होती, जेव्हा त्याला गॅस सिलेंडर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवावी लागे. तर दुसरीकडे त्याला कोचिंग क्लासमध्ये फारशी पुसायला पण लावले होते, पण त्याने या स्पष्टपणे नकार दिला.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मालक असलेल्या शाहरुख खान आणि जुही चावला यांनी २०१८ ला रिंकूला ८० लाखात खरेदी केले होते. रिंकूने कोलकाता नाईट रायडर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आमच्याकडे जास्त पैसे नव्हते. मी सरकारी मैदानावर कमी पैशात आयडीकार्ड बनवून खेळत असे. चेंडू घ्यायला तेव्हा पैशांची गरज लागायची, पण आई वडील ते पैसे पण देऊ शकत नव्हते. मग त्यावेळी मी पैसे जमा करून मोठ्या टीमसोबत खेळायचो. मला माझी आई पाठींबा द्यायची पण वडील पाच भावंडाना मारत असायचे. एकदा मला एका ठिकाणी क्रिकेट मॅच खेळायला जायचे होते; तेव्हा आईने दुकानदाराकडून १००० रुपये घेऊन मला पाठवले होते.”
रिंकूने पुढे सांगितले होते की, “मला माझ्या वडिलांचे पण काम करावे लागत असायचे. जेव्हा मी घरी नसायचो तेव्हा माझ्या वडिलांचा पारा कायम चढलेला असायचा. माझ्याकडे बाईक होती, तेव्हा मला हॉटेलमध्ये सिलेंडर पोहोचवण्याचे काम करावे लागत असे. मला मोहम्मद झिशान नावाचा एक भाऊ आहे. तो मला खूप जीव लावत होता. जेव्हा क्रिकेट खेळायची वेळ आली तेव्हा याच भावाने मला क्रिकेट खेळायला प्रोत्साहित करताना जॉब कर असा सल्ला दिला होता. त्याने मला कोचिंग क्लासमध्ये फरशी पूसण्यास सांगितले होते. पण मी नकार दिला आणि पूर्ण लक्ष क्रिकेटवर दिले.”
रिंकू आयपीएलबद्दल बोलताना म्हणाला की, “मी अलिगढमधून आयपीएलमध्ये निवडला गेलो होतो. घरातील लोक माझ्या निवडीवर खूप खुश झाले होते. मी याच्या आधी एवढे पैसे कधीच पहिले नव्हते. पैसे मिळताच मी छोटे मोठे कर्ज पटापट मिटवून टाकले.”
केकेआरचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगने त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने मागील 2017 पासून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मिळालेल्या 17 सामन्यांमध्ये 251 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणीत खेळताना रिंकूने 33 सामन्यात 59.33 च्या सरासरीने 2433 धावा केल्या आहेत. त्याने 40 लिस्ट मॅचमध्ये 50.15 च्या सरासरीने 1414 धावा केल्या.
भारतीय संघापासून तो अद्याप दूर असला तरी तिथपर्यंत मजल मारण्यासाठी तो मेहनत घेताना नक्की दिसतोय.
महत्त्वाच्या बातम्या-
म्हणून कर्णधार रोहित इतरांपेक्षा वेगळा; सूर्यकुमारने सांगितलं हिटमॅनचं ‘टॉप सिक्रेट’
MIvsRCB: देवदत्त पड्डीकलचं स्थान धोक्यात? ‘हे’ दोन शिलेदार आहेत सलामीच्या स्थानाचे प्रबळ दावेदार