जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसाने घोळ घातला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाचे वातावरण नसल्याने हा सामना झाला, तर पाचव्या दिवशी न्यूझीलंडचे फलंदाज आणि भारतीय गोलंदाज यांच्यामध्ये चुरशीचा सामना बघायला मिळाला. कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंड संघाचा खेळाडू टीम साऊदीने उत्कृष्ट फलंदाजी केली. टीम साऊदीने 46 चेंडूत 30 धावा कुटल्या. ज्यामध्ये दोन षटकारांचा समावेश होता. परंतु त्याच्या एका षटकारामुळे सामन्यामध्ये एक घटना घडली. (Tim Southee’s powerful six injured an audience member and went viral on social media )
टीम साऊदी भारतीय गोलंदाजांच्या विरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी करत होता. साऊदीने फलंदाजी करताना वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू या दोघांच्या विरुद्ध मोठमोठे शॉट खेळले होते. साऊदीच्या या योगदानामुळे संघाच्या धावांमध्ये वेगाने भर पडली. साऊदीने आपल्या डावाचा पहिला षटकार ईशांत शर्माच्या वेगवान गोलंदाजीवर मारला होता. त्यानंतर दुसरा षटकार जडेजाच्या गोलंदाजीवर मारला होता. परंतु साऊदीने दुसरा षटकार मारला, तेव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकाला जाऊन तो चेंडू लागला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/pant_fc/status/1407548413873328128
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, जडेजाच्या गोलंदाजीवर साऊदीने मारलेला षटकाराचा चेंडू स्टेडियममध्ये बसलेल्या दर्शकाच्या डोळ्याजवळ जाऊन लागला. त्या प्रेक्षकाला चेंडू इतक्या जोरात लागला की, त्याच्या डोळ्याच्या जवळ जखम झाली आणि तेथून रक्त येऊ लागले. या प्रेक्षकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tim Southee six result ????
(Popper foto/Getty) pic.twitter.com/dFEtYSAJF9— #BackTheBLACKCAPS ???????? (@KW_Fans436) June 22, 2021
टीम साऊदीच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळेच न्यूझीलंड संघाला भारतीय संघाने दिलेले लक्ष साध्य करण्यास यश मिळाले. भारताचा संघाचा पहिला डाव 217 धावांमध्ये आटोपला होता, तर न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांमध्ये भारतीय संघाने गुंडाळला होता. न्यूझीलंड संघाकडून या डावामध्ये डेवॉन कॉनवे (54), कर्णधार केन विलियम्सन (49) आणि टीम साऊदीने (30) धावांचे योगदान दिले. या तीन खेळाडूंनी न्यूझीलंड संघांसाठी सर्वात जास्त योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन ठरला २१ व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज; ‘या’ दिग्गजाला मागे टाकत पटकावला मान
…अन् चाहत्यांचे सेलिब्रेशन क्षणात बदलले निराशेत, पाहा कॅमेरामनने टिपलेला भन्नाट व्हिडिओ






