क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांबरोबरच कधी-कधी छोटेमोठे अपघातही घडत असतात. एखाद्या फलंदाजाच्या फटक्यामुळे विरोधी संघातील खेळाडू जखमी होतात. तर कधी गोलंदाजामुळे फलंदाजाला दुखापती होत असतात. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या हातून श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) बंगळुरू येथे सुरू असलेल्या दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test) सामन्यादरम्यान २ अपघात घडले आहेत. त्याच्या जोरदार फटक्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा हुकुमी गोलंदाज प्रविण जयविक्रमा (Praveen Jayawickrama) जखमी झाला आहे. तत्पूर्वी पहिल्या दिवशी त्याच्या अशाच एका फटक्यामुळे सामना दर्शकालाही दुखापत झाली होती.
दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा प्रमुख गोलंदाज जखमी
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील सातवे षटक सुरू असताना हा प्रसंग घडला आहे. श्रीलंकेकडून सुरंगा लकमल हे षटक टाकण्यासाठी आला होता आणि भारताकडून रोहित व मयंक फलंदाजी करत होते. या षटकातील लकमलच्या पाचव्या चेंडूवर रोहितने पुढे सरकत कव्हरच्या दिशेने जोराने फटका मारला. परंतु रोहितच्या शॉटचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या श्रीलंकेचा गोलंदाज प्रविण जयविक्रमा याच्या उजव्या गुडघ्यावर जोराने (Praveen Jayawickrama Injured) आदळला.
तो चेंडू जयविक्रमाच्या गुडघ्याला इतक्या जोराने लागला होता की, तो काही वेळ मैदानावर वेदनेने व्हिवळताना दिसला. पुढे श्रीलंका संघाचे फिजिओ त्याच्या मदतीसाठी मैदानावर धावले आणि त्यांनी त्याची तापसणी केली. परंतु त्याला गुडघा गंभीररित्या जखमी झाल्यामुळे शेवटी त्याने मैदान सोडले. जयविक्रमाने या सामन्यातील पहिल्या डावात भारताच्या ३ फलंदाजांना बाद केले होते.
Pravin Jayawickrama leaves the field with an injury. SL now a spinner short.#SLvsIND pic.twitter.com/iXBguqX3Yh
— wajith.sm (@sm_wajith) March 13, 2022
पहिल्या दिवशी दर्शकाचे फुटलेय नाक
याच सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या पहिल्या डावादरम्यान रोहितच्या एका षटकारामुळे सामना पाहण्यासाठी आलेला दर्शक जखमी झाला होता. भारताच्या पहिल्या डावातील सहाव्या षटकातील शेवटच्या सहाव्या चेंडूवर रोहितने डिप मिड विकेटच्या दिशेने हा खणखणीत षटकार खेचला होता. हा त्याच्या संपूर्ण खेळीतील एकमेव षटकार (Rohit Sharma’s Six) होता.
IND vs SL 2022, 2nd Test, Day 1: Rohit Sharma Six https://t.co/L1iDxsyDrB
— Mohammad Salik (@MS150kmph) March 12, 2022
परंतु त्याच्या या षटकाराने सामना पाहण्यासाठी आलेल्या दर्शकाचे मात्र मोठे (Rohit Sharma Hit Spectator’s Nose) नुकसान केले. रोहितने डिप मिड विकेटला मारलेल्या षटकाराचा चेंडू तिथे असलेल्या दर्शकाच्या नाकावर जाऊन लागला. आणि तो चेंडू इतक्या जोराने लागला की, प्रथमोपचार केल्यानंतरही त्या दर्शकाच्या नाकातून रक्त वाहायचे थांबले नाही. परिणामी नंतर त्याला बंगळुरूतील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याच्या नाकाचा एक्स-रे काढण्यात येईल. या डावात रोहित फक्त १५ धावा करून झेलबाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी त्या गोष्टीचा विचार करत नव्हतो’, बंगळुरू कसोटीत ९२ धावांवर बाद झालेल्या श्रेयसची प्रतिक्रिया
लंकेच्या विजयाच्या आशेला कर्णधार रोहितकडून बूच, जोरदार फटक्यामुळे हुकुमी गोलंदाज जायबंदी
ताक धिना धिन! डी सिल्वाची विकेट घेतलेल्या शमीच्या डोक्याला अश्विनने बनवले तबला, पाहा व्हिडिओ