भारतीय संघ टी२० विश्वचषकानंतर १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडसोबत मायदेशातील मालिका खेळणार आहे. यामध्ये तीन टी-२० सामन्यांची आणि दोन कसोटी सामन्यांची अशा दोन मालिकांचा समावेश आहे. १७ तारखेला टी२० मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मनसिंग स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांना स्टेडिममध्ये प्रवेश दिला जाणार आहे, पण त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. राजस्थान क्रिकेट संघ (आरसीए) चे सचिव महेंद्र शर्मांनी याविषयी माहिती दिली आहे.
महेंद्र शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे स्टेडिममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कमीत कमी एक कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असणे आणि ४८ तासांच्या आतमधील कोरोना निगेटिव्ह अहवाल असणे गरजेचे आहे.
याविषयी माहिती देताना महेंद्र सिंग म्हणाले की, “कोविड १९ प्रोटोकॉलचे पालन करून सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबत राज्य सरकारच्या गृह विभागाने मार्गदर्शन मागितले होते. राजस्थान क्रिकेट संघाला याविषयी विभागाकडून सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबत अनुमती मिळाली आहे.” सामन्यात प्रेक्षकांना सर्व प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिंग यांच्यासारख्या नियमांचा समावेश आहे.
“राज्य सरकारद्वारे दिलेल्या नियमावलीप्रमाणे प्रेक्षकांव्यतिरिक्त कर्मचारी आणि खेळाडूंनाही कोरोनाच्या कमीत कमी एका लसीसोबत मास्कचा अनिवार्य उपयोग, स्वच्छता, थर्मल स्क्रीनिंग, योग्य वेंटिलेशन आणि लसीकरण या नियमांचे पालन करावे लागेल. सामन्याआधी तयारीशी संबंधीत विवध मुद्दे आणि कामांविषयी चर्चा करण्यासाठी सामन्याच्या आयोजनासाठी तयार केलेल्या समितीसोबत बैठक, १० नोव्हेंबरला ४ वाजता आयसीसी अकदमीत होईल,” अशी माहिती महेंद्र सिंग यांनी दिली.
दरम्यान, न्यूझीलंड १७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत भारताच्या दौऱ्यावर असणार आहे. मालिकेची सुरुवात १७ नोव्हेंबरपासून होईल. त्यानंतर १९ नोव्हेंबरला रांचीमध्ये मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळला जाईल. तिसरा सामना २१ नोव्हेंबरला कोलकातामध्ये होईल. त्यानंतर कसोटी मालिकेतील पहिसा सामना कानपुरलामध्ये २५ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान होईल. दुसरा कसोटी सामना ३ ते ७ डिसेंबरमध्ये मुंबईत खेळला जाईल.
न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल और मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक कोण जिंकणार? फाफ डू प्लेसिसने घेतली ‘या’ दोन संघांची नावे
टी२० विश्वचषक: इंग्लड-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये ‘हे’ पाच खेळाडू बजावतील मुख्य भूमिका