---Advertisement---

आनंद गगनात मावेना! भारतीय संघात निवड होताच विमानतळावरून आवेश खान थेट प्रशिकाच्या घरी, कारण…

On: बुधवार, नोव्हेंबर 10, 2021 9:52 PM
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात मध्यप्रदेशचा वेगवान गोलंदाज अवेश खान याचीही निवड झाली आहे. टी-२० संघात समाविष्ट असलेला वेगवान गोलंदाज अवेश खान याने बुधवारी (९ नोव्हेंबर) सांगितले की, देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.

गेल्या तीन महिन्यात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळल्यानंतर, अवेश इंदूरला परतला आणि विमानतळावरून थेट माजी भारतीय क्रिकेटपटू आणि त्याचे प्रशिक्षक अमय खुरासिया यांच्या घरी गेला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. अमेयने भारतासाठी १२ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

अवेश इंदूरला परतल्यानंतर भारतीय संघात त्याची निवड झाल्याबद्दल त्याच्या घरी नातेवाईक आणि चाहत्यांची झुंबड उडाली होती. यावेळी त्याचे कुटुंबीय लोकांचे तोंड गोड करताना दिसले आणि त्यांनी आपल्या मुलाच्या या यशाच्या जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी केली.

दरम्यान, अवेश खानने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आपल्या देशासाठी खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने खूप कठोर परिश्रम केले होते. माझे हे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.’

अवेश खान म्हणाला की, त्याने मागील देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. ज्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकले. २४ वर्षीय वेगवान गोलंदाजाने आपल्या यशाचे श्रेय अमय खुरासिया, चंद्रकांत पंडित, देवेंद्र बुंदेला आणि अब्बास अली या माजी क्रिकेटपटूंना दिले, ज्यांनी त्याची क्षमता ओळखली आणि आपल्या मार्गदर्शनाने त्याला यशस्वी केले. अवेश खान म्हणाला की, मला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती आणि मला व्यावसायिक क्रिकेटपटू बनायचे होते.

या वेगवान गोलंदाजाचे वडील आशिक खान यांना आपल्या मुलाच्या स्वप्नांना कसे पंख मिळाले हे आठवते. ते म्हणाले, ‘माझा मुलगा पहिल्यांदा इंदूर कोल्ट्स क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला. त्यानंतर अमय खुरासिया यांनी त्याची प्रतिभा ओळखून त्याला आपल्या क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी निवडले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.’

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत-न्यूझीलंड पहिला टी२० सामना स्टेडियममधून पाहाता येणार, पण ‘या’ दोन अटी कराव्या लागणार पूर्ण

मोठे व्यक्तिमत्त्व! नोबेल पुरस्कार विजेती मलालाच्या पतीचे आहे पाकिस्तान क्रिकेटशी घनिष्ठ नाते, वाचा सविस्तर

टी२० विश्वचषक कोण जिंकणार? फाफ डू प्लेसिसने घेतली ‘या’ दोन संघांची नावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---