इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना बुधवारपासून (दि. 28 जून) खेळला जाणार आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज भेदक गोलंदाजीने फलंदाजांच्या दांड्या उडवताना दिसतील, तर दुसरीकडे फिरकीपटू फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यात सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फिरकीपटू नेथन लायन याच्यावर असतील. या सामन्यात लायनकडे एक जबरदस्त विक्रम रचण्याची संधी आहे.
सलग 100वा कसोटी सामना
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघातील दुसरा कसोटी सामना नेथन लायन (Nathan Lyon) याच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या कसोटीत मैदानावर पाऊल ठेवताच नेथन लायन सलग 100वा कसोटी सामना ( Nathan Lyon 100th consecutive Test) खेळण्याचा विक्रम नावावर करेल. विशेष म्हणजे, क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारा लायन हा एकमेव फिरकीपटू बनेल.
तब्बल 500 विकेट्स करेल पूर्ण
कसोटी क्रिकेटमध्ये लायन याचे नाव दिग्गज गोलंदाजांच्या यादीत सामील होते. सातत्याने विकेट घेण्याची त्याची क्षमता इतर संघासाठी नेहमीच मोठा धोका निर्माण करते. लायनने जवळपास प्रत्येक परिस्थितीत खेळताना यश मिळवले आहे. त्याने आतापर्यंत 121 कसोटी सामने खेळताना 31.23च्या सरासरीने आणि 2.93च्या इकॉनॉमी रेटने 495 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच, कसोटी क्रिकेटमध्ये तो ऑस्ट्रेलियाकडून तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याच्याआधी अनुभवी फिरकीपटू शेन वॉर्न याने विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, ग्लेन मॅकग्रा याने कसोटीत 563 विकेट्स नावावर केल्या आहेत. लायन कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा 8वा गोलंदाज बनण्यापासून फक्त 5 विकेट्स दूर आहे. (spinner nathan lyon to complete 500 test wickets in eng vs aus lords test ashes 2023)
कसोटीत सर्वाधिक घेणारे गोलंदाज
800 विकेट्स- मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
708 विकेट्स- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
685 विकेट्स- जेम्स अँडरसन (इंग्लंड)
619 विकेट्स- अनिल कुंबले (भारत)
582 विकेट्स- स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
563 विकेट्स- ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
519 विकेट्स- कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज)
495 विकेट्स- नाथन लियोन (ऑस्ट्रेलिया)*
महत्वाच्या बातम्या-
‘फायनलमधील धोनीच्या रणनीतीविषयी मला माहिती होतं…’, मुथय्या मुरलीधरनचा मोठा खुलासा
विश्वचषकापूर्वीच सेहवागची मोठी भविष्यवाणी, ‘हे’ 4 संघ खेळतील सेमीफायनल; भारताव्यतिरिक्त 3 टीम कोणत्या?