---Advertisement---

सर्वात महत्त्वाच्या सामन्यातून अश्विनची हाकालपट्टी, अनुभवी गोलंदाजाविषयी काय म्हणाला रोहित? लगेच वाचा

On: बुधवार, जून 7, 2023 5:38 PM
R-Ashwin-And-Rohit-Sharma
---Advertisement---

बुधवारपासून (दि. 07 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळला जात आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावरील या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या सामन्यात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसोबत मैदानावर उरतला आहे. खरं तर, जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत रविचंद्रन अश्विन याच्याशिवाय खेळत आहे.

भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विन (R Ashwin) याला सामील केले गेले नाहीये. त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमी या निर्णयावर खुश नाहीयेत. कारण, अश्विनची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी खूपच शानदार आहे. इतकेच नाही, तर तो आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही पहिल्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडमधील परिस्थितीत सध्या वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा मिळेल, पण रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही मोलाचे योगदान देऊ शकतो. नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आम्ही आधी गोलंदाजी करू. आम्ही हा निर्णय येथील परिस्थिती आणि वातावरण पाहून घेतला आहे. मला वाटत नाही की, खेळपट्टीमध्ये जास्त बदल पाहायला मिळेल. तुम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे आणि अव्वलस्थानी आपली जागा बनवायची आहे.”

“आम्ही या सामन्यात चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसोबत उतरलो आहोत. फिरकीपटू रवींद्र जडेजा आहे. रविचंद्रन अश्विन याला संघातून बाहेर ठेवणे नेहमीच कठीण असते. कारण, त्याने मागील अनेक वर्षांपासून संघासाठी विजयी कामगिरी केली आहे. संघासाठी जे गरजेचे असते, तोच निर्णय घेतला जातो. रहाणेच्या येण्यामुळे आमच्या संघात अनुभव आला आहे. कारण, त्यानेही 80 कसोटी सामने खेळले आहेत आणि संघासाठी शानदार प्रदर्शन केले आहे.”

अश्विनला बाहेर ठेवल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “उमेशच्या जागी अश्विनला घ्यायला पाहिजे होतं.”

दुसऱ्या एकाने ट्वीट केले की, “कसोटीतील अव्वल क्रमांकाच्या गोलंदाजाला बाहेर करणे मोठी चूक. अश्विनची उणीव नक्की भासेल.”

आणखी एकाने ट्वीट करत असे लिहिले की, “अश्विनला बाहेर काढणे चुकीचे. तो एक सामना विजेता खेळाडू आहे. त्याला दबावाच्या स्थितीत कसे खेळायचे माहिती आहे. देशहितासाठी रोहितने स्वत:ला बाहेर केले पाहिजे.”

एकाने असेही म्हटले की, “अश्विनला न खेळवणे ही मोठी चूक.”

रोहित शर्मा खेळतोय 50वा कसोटी सामना
विशेष म्हणजे, हा सामना रोहितसाठी खूपच खास आहे. कारण, तो त्याचा 50वा कसोटी सामना खेळत आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत तिन्ही क्रिकेटप्रकारात चांगली कामगिरी केली आहे.

आर अश्विनविषयी बोलायचं झालं, तर तो आयसीसी पुरुष कसोटी अष्टपैलूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. अश्विनने असे अनेक सामने खेळले आहेत, ज्यात स्वत:च्या जोरावर संघाला विजयी केले आहे. त्याने नेहमीच चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे. (spinner ravichandran ashwin not in playing 11 in wtc final 2023 read rohit sharma statement)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारीच! रोहित बनला ‘अशी’ कामगिरी करणारा भारताचा पाचवा कर्णधार, सर्वात भारी रेकॉर्ड ‘कॅप्टन कूल’ धोनीचा
टॉस रोहितने जिंकला अन् विक्रम विराटच्या नावावर झाला, पाहा नक्की काय घडलं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---