भारतीय संघाने मागील वर्षी मेलबर्न येथे पार पडलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील ऐतिहासिक सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव केला होता. या सामन्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. अशात भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील या सामन्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने यावेळी बाद होऊन तंबूत जाणाऱ्या दिनेश कार्तिक याच्याविषयी भाष्य केले. चला तर तो काय म्हणाला जाणून घेऊयात…
काय म्हणाला अश्विन?
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) म्हणाला की, ज्यावेळी सामन्याच्या अखेरीस दिनेश कार्तिक बाद झाला आणि त्याला मैदानावर जावे लागले, तेव्हा तो मनातल्या मनात कार्तिकला दोष देत होता. त्याने सांगितले की, तो विचार करत होता, इतक्या कठीण स्थितीत त्याला फलंदाजीला जावे लागत आहे.
‘मी कार्तिकला दोष देत मैदानावर आलो’
अश्विनने त्या सामन्याची आठवण काढत सांगितले की, विराट कोहली (Virat Kohli) याने त्याला एका चेंडूवर खेळण्यासाठी सात पर्याय दिले होते. आयसीसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अश्विनने सांगितले की, “मी दिनेश कार्तिकला दोष देत होतो की, त्याने मला हे कठीण काम करण्यासाठी दिले. मी त्याला दोष देत क्रीझवर आलो. मला आठवते की, त्यावेळी लोक खूपच आरडाओरड करत होते. मी अशी गर्दी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.”
https://www.instagram.com/p/CuDtYSNMdCG/
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना खूपच रंजक झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला 4 विकेट्सने पराभवाचा धक्का देत विजय मिळवला होता. या सामन्यात विराट कोहली याने नाबाद 82 धावा करून महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसरीकडे, दिनेश कार्तिक फक्त एक धाव करून बाद झाला होता. सामन्याच्या अखेरच्या क्षणात जेव्हा काही धावाच करायच्या होत्या, तेव्हा कार्तिक एका वाईड चेंडूवर यष्टीचीत बाद झाला. त्यानंतर आर अश्विन (R Ashwin) याला क्रीझवर यावे लागले. मात्र, अश्विनला जास्त समस्यांचा सामना करावा लागला नाही. मोहम्मद नवाज याने एक चेंडू वाईड टाकला आणि पुढच्या चेंडूवर अश्विनने शानदार फटका मारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. (spinner ravichandran ashwin relives mcg epic against pakistan talked about dinesh karthik)
महत्वाच्या बातम्या-
KKRच्या गोलंदाजाचा दुलीप ट्रॉफीत राडा, अवघ्या 75 चेंडूत ठोकलं वादळी शतक; कोण आहे तो?
‘एमपीएल आणि वनडे विश्वचषकामुळे पुण्यात क्रिकेट संस्कृती वाढणार’, शरद पवार यांचे प्रतिपादन