---Advertisement---

WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा

On: बुधवार, जून 7, 2023 11:50 PM
Rohit-Sharma-And-R-Ashwin
---Advertisement---

बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यातील पहिल्याच दिवशी भारताविरुद्ध कडवी झुंज दिली आहे. बुधवारपासून (दि. 07 जून) खेळल्या जात असलेल्या या सामन्यासाठी दोन्ही संघ इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर आमने-सामने आहेत. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे अव्वल 3 फलंदाज लवकर तंबूत परतले, पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात 200हून अधिक धावांची भागीदारी झाली. यावेळी भारतीय गोलंदाज संपूर्ण दिवस विकेटसाठी तरसताना दिसले.

रोहित शर्माला ड्रिंक्स ब्रेकदरम्यान आर अश्विनकडून ‘टिप्स’
डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्याच्या पहिल्या दिवशी एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खरं तर, भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) ड्रिंक्स ब्रेकदरम्यान मैदानावर आला होता. यावेळी अश्विन रोहित शर्माला टिप्स देताना दिसला.

यादरम्यान आर अश्विन आणि रोहित शर्मा (R Ashwin And Rohit Sharma) यांच्यासोबत मोहम्मद सिराज आणि उमेश यादव हे खेळाडूही दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याव्यतिरिक्त नेटकरीही या फोटोवर कमेंट करत आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी अश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचेही म्हटले आहे.

आर अश्विन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
विशेष म्हणजे, आर अश्विन याला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले नाहीये. आर अश्विन याच्या जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यावर विश्वास टाकला. यानंतर सोशल मीडिया युजर्ससह अनेक दिग्गजांनी रोहित आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रिकी पाँटिंग यानेही म्हटले की, “आर अश्विन शानदार गोलंदाज आहे. अश्विनला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवले पाहिजे होते.”

असे असले, तरीही ड्रिंक्स ब्रेकदरम्यान अश्विन रोहितला टिप्स देताना दिसला. आता सोशल मीडिया युजर्स पुन्हा अश्विनविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (spinner ravichandran ashwin tips during drinks break rohit sharma ind vs aus wtc final wtc 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार-प्रशिक्षक जोडीवर सुनील गावसकर नाराज! समालोचन करतानाच केली आगपाखड
विराट की स्मिथ, कोण आहे सर्वोत्तम फलंदाज? वाचा 3 माजी दिग्गजांची उत्तरे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---