भारतीय संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. या स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळवले जात आहेत. अशात भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथ्या सराव सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने मोठे विधान केले. अश्विनने शनिवारी (दि. 30 सप्टेंबर) मान्य केले की, 2023चा वनडे विश्वचषक त्याचा भारतासाठी अखेरचा विश्वचषक ठरू शकतो.
खरं तर, अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) दुखापतग्रस्त झाल्यामुळे वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे त्याच्या जागी आर अश्विन (R Ashwin) याला संघात सामील केले गेले. यावेळी अश्विनने हेही मान्य केले की, त्याची निवड केल्यानंतर त्याला धक्काच बसला होता. कारण, त्याने विश्वचषकाच्या ताफ्यात सामील होण्याबाबत कोणताही विचार केला नव्हता.
काय म्हणाला अश्विन?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना अश्विन म्हणाला, “प्रामाणिकपणे मी इथे असण्याचा विचार करत नव्हतो (विश्वचषकासाठी उशिरा झालेल्या निवडीविषयी बोलताना). मागील 4-5 वर्षांमध्ये खेळाचा पुरेपूर आनंद घेणे, हाच माझा मुख्य उद्देश राहिला आहे. तसेच, या स्पर्धेतही मला ते पुन्हा करायला आवडेल. मी मीडियाच्या व्यक्तीला सांगितले की, त्याने मला आता काही काळ कॅमेऱ्यासमोर ठेवू नये, परंतु ही कदाचित अशा परिस्थिती आहे, जिथे तो म्हणाला की, दिनेश कार्तिक तुमची मुलाखत घेत आहे आणि मी संधीचे पालन केले.”
अखेरचा विश्वचषक
पुढे बोलताना तो असेही म्हणाला की, “मला माहिती नाही, मी सारखं म्हणत राहिलोय की, भारतासाठी हा माझा शेवटचा विश्वचषक आहे. माझ्यासाठी या स्पर्धेचा पूर्ण आनंद घेणे महत्त्वाचे आहे.”
Ravichandran Ashwin said:
" I don't know if this could be my last tournament for India " pic.twitter.com/htxW1ZF3a9
— Broken Cricket (@BrokenCricket) September 30, 2023
अश्विन दीर्घ काळानंतर ताफ्यात
आर अश्विन अलीकडेच भारतीय संघात परतला आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत ताफ्यात सामील केले गेले. मात्र, त्यापूर्वी तो अखेरचा वनडे सामना जानेवारी 2022मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. मात्र, अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे त्याला विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघात सामील केले गेले. अशात विश्वचषकात संघाला अश्विनकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. (spinner ravichandran ashwin to retire from odis after world cup 2023 he drops massive hint)
हेही वाचा-
सराव सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने-सामने, टॉस जिंकून रोहितने घेतली बॅटिंग; पाहा संघ
ब्रेकिंग! RCB महिला संघाला मिळाला नवीन मुख्य प्रशिक्षक, आख्ख्या करिअरमध्ये खेळलाय फक्त 5 सामने