जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने सोमवारी (दि. 20 नोव्हेंबर) भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेची घोषणा केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत आमने-सामने येणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याला 23 नोव्हेंबरपासून विशाखापट्टणम येथे सुरुवात झाली. अनेक क्रिकेटप्रेमींना या टी20 मालिकेची प्रतीक्षा लागली होती. हा सामना भारताने अखेरच्या चेंडूवर षटकार मारून जिंकला. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने कर्णधार सूर्यकुमार यादवला सल्ला दिला.
खरं तर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या खांद्यावर सोपवली आहे. या मालिकेत भारतीय संघाने अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे सूर्याला कर्णधार बनण्याची संधी मिळाली आहे.
नुकत्याच संपलेल्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत सूर्यकुमार यादव 7 सामने खेळला होता. मात्र, त्याने स्पर्धेत खूपच खराब प्रदर्शन केले होते. मात्र, आता आगामी मालिकेत तो कर्णधारपद आणि शानदार फलंदाजी करताना दिसेल. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. याविषयी अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने आपले मत मांडले आहे.
काय म्हणाला अश्विन?
आर अश्विन (R Ashwin) याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर सूर्यकुमार यादवविषयी एक स्टोरी शेअ केली आहे. या स्टोरीमध्ये दिसते की, सूर्या फलंदाजीचा सराव करत आहे. ही स्टोरी शेअर करत अश्विनने लिहिले की, “चांगली कामगिरी कर मित्रा, आपल्या देशाच्या संघाचे नेतृत्व करणे खरंच सन्मानाची बाब आहे.”
सूर्याचे टी20तील प्रदर्शन
सूर्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 53 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेलले आहेत. यादरम्यान त्याने 46.02च्या शानदार सरासरीने 1841 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 15 अर्धशतकेही निघाली आहेत. 117 ही त्याची टी20तील सर्वोच्च खेळी आहे. (spinner ravichandran ashwins special message for indias stand in t20i captain suryakumar yadav ahead australia t20 series)
हेही वाचा-
BREAKING: वर्ल्डकप संपताच ICCने उचललं मोठं पाऊल, माजी वर्ल्ड चॅम्पियनवर घातली 6 वर्षांची बंदी
कर्णधार बनताच सूर्याने युवा टीम इंडियाला दिली सूट; म्हणाला, ‘मी स्पष्ट शब्दात सांगितलंय, जावा आणि…’