बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना सुरु एजबस्टन मैदानावर सुरु आहे. या सामन्यात अश्विनने दुसऱ्यांदा इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकला बाद केले.
विषेश म्हणजे दोन्हीवेळेस त्याने कूकला त्रिफळाचीत केले. त्यामुळे आता अश्विनने कूकला नवव्यांदा कसोटीत बाद केले आहे.
अश्विन हा आता कूकला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे. यात त्याने आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लायनला मागे टाकले आहे. लायनने कूकला 8 वेळा बाद केले आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचाच रविंद्र जडेजा आहे. त्याने कूकला आत्तापर्यंत 7 वेळा बाद केले आहे. मात्र या सामन्यासाठी त्याला भारताच्या 11 जणांच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही.
कसोटीत अॅलिस्टर कूकला सर्वाधिक वेळा बाद करणारे फिरकी गोलंदाज:
९ – आर अश्विन
८ – नॅथन लीऑन
७ – रवींद्र जडेजा #म #मराठी @Maha_Sports— Pranali Kodre (@Pranali_k18) August 2, 2018
तसेच अश्विनने यापुर्वी केवळ डेविड वार्नरला 9 वेळा कसोटीत बाद केले आहे. तर इंग्लंडच्याच कोवनला 7 वेळा बाद केले आहे.
या सामन्यात अश्विनने पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक 62 धावात 4 विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाखेर 1 विकेट घेतली आहे. दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने 1 बाद 9 धावा केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–दिग्गज ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाला विराट कोहलीकडून धक्का
–यापूर्वी जगातील कोणत्याच क्रिकेट संघाच्या कर्णधाराने असा निर्णय घेतला नसेल
–१९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेने दिला धक्का